आज सुद्धा पाऊस कोसळतोय...
हा 'सुद्धा ' शब्द काही वेगळाच आहे...
भूतकाळाच्या कुठल्या आठवणी शी कधी कुठल्या माध्यमातून एकरूप करेल....काही सांगता यत नाही.
अंग पूर्ण पने भिजलय....या पावसातून सुटका नाही....अगदी मनाची सुदधा.....
आणि सुटका करायची तरी कुणाला आहे??
आठवणीनं मध्ये एक वेगळीच नशा असते...आणि नशा चांगली कुवा वाईट नसते..नशा नशा असते..
ती मला पहिल्यांदा अश्याच पावसात याच ठिकाणी भेटली...चिंब भिजेली ती त्या मुसळधार पावसात..
तिचे ते भिजलेले केस...
तोंडावर पावसात स्वतःला आणि हातातली पर्स सांभाळताना आलेले ते भाव...सगळं कसं जीवघेणं होत..
मी पावसा पेक्षा त्यातच जास्त भिजलो...
क्षणासाठी सगळं थांबलेलं.. तिचा तो सुंदर चेहरा आणि माझी त्याचावरची नजर...या पलीकडे जगात काही आस्तित्वात आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता ..
मी खरं तर खूप कंटाळलो म्हणून तिथे होतो...
सगळ संपलेलं माझ्या साठी..
पण मला तिथे ती मिळाली..
मला तिच्या बरोबर बोलावंसं वाटलं....मनापासून...
ती कोण होती माहित नव्हतं...
आम्ही कधी आधी भेटलो हि नव्हतो...पण काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच होतात ना..
ही पण त्यातलीच एक..
मन आणि डोकं पहिल्यांदा एकमत होत..
' जा तीच्याबरोबर बोल...ती कोण आहे विचार '
मी स्वतःलाच सांगत होतो...मी..मी तुमची मदत करू का??
माझ्या त्या शब्दांबरोबरच तिने माझ्या कडे बघितलं...त्यातून एकच गोष्ट झाली की मी फुडें काहीच बोलू शकलो नाही..
ती हसली...
ते अनुभवन्यात पण वेगळंच आनंद होता..आज दहा वर्षानंतर मी एक सफल व्यक्ती आहे..
त्या हसण्याने मला एक वेगळीच आशा दिली..
आनंद दिला..वेळ बदलली...काळ फुडें गेला
आज ही पाऊस पडतोय...पण आज ती तशी एक अनोळखी व्यक्ती म्हणून पावसात बभिजताना पर्स सांभाळताना दिसणार नाही...कारण ती माझ्या बरोबर आहे...
माझा हात धरून ...माझ्या डोळ्यात बघत तशीच हसत..
आज ती माझी बायको आहे...