कोण होता तो ?

185 3 2
                                    

दार वाजलं तशी रुचिकानं दार उघडलं. बाहेर तिच्याच वयाच्या एक बाई उभ्या होत्या. बरोबर सात एक वर्षांचा मुलगा होता."कोण आपण? कोण पाहिजे?"
"मी अंजली इनामदार.डोंबिवलीहून आले.हा माझा मुलगा केतन".
मी ओळखलं नाही तुम्हाला."
"मी तरी कुठे ओळखते तुम्हाला?"
"मग ?????".
" सांगते.  आत येऊ?"
रुचिकानं जरा नाइलाजानंच त्याना आत घेतलं.
" बसा" ती म्हणाली."
अंजली बसली.केतन तिला बिलगून उभाच राहिला. " काय काम होत तुमचं माझ्याकडे?" रुचिकानं विचारलं
"सांगते."म्हणून अंजली काही क्षण तशीच बसली.
" रुचिकाला जरा रागच आला. कोण आगंतुक बाई, न् वेळ काढत्ये उगीचच.
" जरा पाणी देता?" अंजलीनं घाम टिपत विचारलं
" हुं" रुचिका जरा वैतागून म्हणाली. मग टेबलावरचं भारी रिस्टवॉच उचलत ती पाणी आणायला आत गेली.
" बोला, काय काम आहे तुमचं?"
रुचिकानं तीव्र आवाजात विचारलं .
" कसं सांगावं कळत नाहीये. हा माझा मुलगा केतन "
" बरं"
एवढ्यात केतन तिथून दूर होऊन समोरच्या भितीशी  गेला. " हा बघ शाल्मलीताईचा फोटो". तो एकदम उर्मीनं म्हणाला.
" हा पण सेंट जोसेफ शाळेत जातो का?" रुचिकानं कुतुहलानं विचारलं
" नाही. तो डोंबिवलीच्या दाते प्रशालेत जातो."
"मग हा माझ्या मुलीला कसा ओळखतो?"
"तेच सांगायला मी आले आहे रुचिकाताई".
रुचिकाला स्वत:चं नाव ऐकून विस्मय वाटला
" केतन बाळा तू जरा तिकडे बसतोस का?" अंजलीनं खोलीच्या टोकाला असलेल्या सोफाकडे निर्देश केला. केतन जरा नाखुशीनंच तिकडे चुळबुळत बसला."मागच्या आठवड्यात केतनला सपाटून ताप आला. त्यात तो काही विचित्रच बरळू लागला. आम्ही त्याचे आईवडीलच नाही, त्याचे आईवडील दुसरेच आहेत, त्याला एक मोठी बहीण आहे वगैरे बोलू लागला. त्याचं म्हणणं आहे कि तुम्ही त्याचे आईवडील आहात. व हे त्याचं खरं घर आहे. त्याचं नावही केतन नाहिये........"
रुचिका जरा घाबरलीच. पण जोडीला ती त्रासली पण. " नेमकी मी एकटी!घरात शरद असते तर बरं झालं असतं"रुचिकाला वाटून गेलं .पणआता या प्रसंगाला तोंड देणं भागच होतं. तिची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची होती. "पैसे उकळण्याचा प्रकार असणार.सावध राहिलं पाहिजे." तिच्या मनात आलं
"हे पहा अंजलीबाई,मी किंवा माझे मिस्टर अंधश्रद्धांच्या अगदी विरुद्ध आहोत.असल्या भाकडकथांवर माझा विश्वास बसेल असं तुम्ही क्रुपया समजू नका.इथे येण्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या सायकियाट्रिस्ट कडे नेणं गरजेचं होतं असं मला वाटतं .
" मला समजतय ते रुचिकाताई. सगळं करून झालय ते.आधी  त्याची समजूत काढून पाहिली. तापात काहीतरी बरळतोय असं वाटलं . मगआमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो.त्याना सगळं सांगितलं .त्यांनी  हळुवारपणे त्याला प्रश्न विचारले. तो आपल्या म्हणण्यावर ठाम होता. त्यांनी तापाचं औषध दिलंच; शिवाय त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या ओळखीच्या मानयोपचार तद्न्यांकडे गेलो. त्यांनी विचारपूस केल्यावर केतननं तुमची सर्वांची नावं आणि पत्ता सांगितला. त्या डॉक्टरांनी सहज डिरेक्टरी काढून पाहिलं तर नाव ,पत्ताजुळत होता. ते ही चक्रावले."त्याला आत्ता त्रास नको .आधी ताप बरा होऊ दे "म्हणाले.   आम्ही मग घरी गेलो. ताप उतरू लागला तरी केतन परतपरत तेच बोलत होता.त्याचं  मन रमावं म्हणून त्याला खेळणी, गेम्स आणून दिले. तर म्हणाला" शाल्मलीताईकडे खूप मोठा टेडी आहे पिंक कलरचा, पण ती मला देत नाही तो  खेळायला,म्हणून मी तो टेडी खिडकीतून खाली टाकून दिला"
आता रुचिका थक्कच झाली. तो टेडी आपल्या रोहननं खाली टाकला तेव्हा शरदनी त्याला प्रथमच चापटी मारली. एरवी तशी वेळच येत नसे इतका रोहन शहाणा ,शांत समजूतदार होता.शाल्मलीच्या अगदी विरूद्ध स्वभाव होता त्याचा.ती प्रेमळ पण हट्टी ,आग्रही स्वभावाची होती. रोहन मात्र शहाणा, लोभस, शांत,धीमा लाघवी होता.
..

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 27, 2018 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

कोण होता तो?Where stories live. Discover now