"दे ना सोडून... तुला अक्कल नाहीये का? बिनडोक आहेस तू! प्रेम वगैरे काही नसतं..."
कोणीतरी तिला समजावत होतं... ओरडून ओरडून सांगत होतं.
"बघ, तो तुला सोडून गेलाय... एक दिवस अचानक, काहीही न सांगता... त्यानंतर त्याने तुला स्वत:हून कधीच फोन केला नाही, ना मेसेज केला. तुला वेड लागलं होतं."
"अगं दीड वर्षांपूर्वी काय झालं होतं माहितीये ना तुला? ट्रिटमेंट सुरू होती तुझी. विसरलीस का? चांगली नोकरी होती. ती ही घालवलीस.. रात्री अपरात्री शुन्यात कुठंतरी बघत बसायची. रात्र रात्र झोपायची नाहीस... कुठंतरी भटकायची... आठव सगळं... तेव्हा मी मी... आणलं तुला सगळ्यातून बाहेर... किती फोन केले त्याला तू? पण दाखवली का माणूसकी त्यानं? तू जीव द्यायला निघाली होतीस तेव्हाही आला नाही तो... मग आता त्याला मदत हवी आहे तर तू का जातेस? दे सोडून त्याला... नाहीतर मर मग राहा तशीच."
तिची मैत्रिण तिच्यावर भडकली आणि निघून गेली. कार्तिका तरीही शून्यात बघत बसून होती. आतापर्यंत डोळ्यात साचलेले पाणी तिच्या डोळ्यातून वाहू लागलं. समुद्र किनाऱ्यावर ती बसली होती. लाटांसारख्या भूतकाळातल्या आठवणी मनाच्या किनाऱ्यावर येऊन धडकत होत्या आणि पुन्हा त्या आठवणीच्या खोल खोल समुद्रात तिला घेऊन जात होत्या...
"ती म्हणाली दे सोडून त्याला... खरंच शक्य आहे का?", कार्तिका विचार करत होती.
दीड वर्षांनंतर त्यानं पहिल्यांदा मला मेसेज केला होता.
'Hi, how are u? मला माहितीये मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो. गेल्या दीड वर्षांत मी तुला एकदाही फोन केला नाही. तुझी साधी चौकशीही केली नाही. तू कशातून गेली आहे हे सगळं कळलंय मला. शक्य असेल तर मला माफ कर. पण आपण हे सगळं विसरून नव्यानं सुरूवात करुया का? मीही तुला नाही विसरु शकलो. माझीही तब्येत खूप बिघडली आहे. माझंही कौन्सिलिंग सुरू आहे. रात्र रात्रभर झोप नाही लागत. मी जॉबही सोडलाय. कौन्सिलर म्हणत होती की तुला जर कोण ठिक करु शकते तर ती कार्तिकाच आहे... मी तुला त्रास देऊन खूप चूक केली. आता सगळं मी भोगतोय. आयुष्यात काहीच ठिक होत नाहीये. मला आता ते ठिक करायचं आहे. प्लीज शक्य असेल तर मला रिप्लाय कर मी वाट बघतोय..."
YOU ARE READING
मनातिल सौदर्य...
Short Storyबाहेरील सौदर्यावर प्रेम करण्यापेक्षा मनातिल सौदर्यावर प्रेम करणं नेहमीच चांगलं.....