शाळेचा पहिला दिवस -
शाळेत जायची तयारी झाली ,नवीन शाळा नवीन माणसं आनुभवायला मिळणार होती त्यामुळं आज खूपच आनंदात होता दिग्या. दिग्या म्हणजे आमच्या या स्टोरीचा हिरो बर का , तसे बरेच कैरेक्टर आपण ह्या काहणी मध्ये बघणार आहोत पण आपला हिरो म्हणजे अलगच चिज होता . आपला हिरो मुळचा सातारचा बर का!सातारी माणसाचा तोराच वेगळा . दिग्या पहिल्या पासूनच इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. हानुन मारुन घडविलेला विद्यार्थी !!! पण हुशार आणि प्रामाणिक . ऐक नं चा कलाकार बरं का. शाळा हा विषयच खूप खोल होता दिग्यासाठी . पाचवी पर्यंत दिग्या दुसऱ्या शाळेत होता पण आता तो दुसऱ्या शाळेत जाणार होता.दिग्या जाम खुश होता त्याचा तो आनंद आणि उत्साही ही. आज आईन मनपसंत डब्बा बनवला होता ,बाबांनी त्याला खुप सारया गोष्टी सांगितल्या शाळेत मस्ती करायची नाही आणि बरंच काही .दिग्या न ते मनापासून ऐकलं ,काय करणार हायकमांड चे आदेश पाळावे तर लागणार . दिग्या निघाला शाळेला मोकळ दफ्तर आणि त्यात भरलेला डब्बा घेऊन. शाळेच्या आवारात पोहोचल्यावर त्यानं आजुबाजुचा परिसर पाहिला खुप छान होता तो परिसर. खूप मोठी शाळा नव्हती ती . पुढे छोटासा मैदान मैदानाच्या बाजूला ऐक छोटासा मंदिर . हि शाळा आता आपलं दुसरे घरच होणार होती हे दिग्याला कळाल होत ,त्यांन आल्या आल्या गेट मध्येच जमिनीस हात लावुन नमस्कार केला. शाळेत जावुन तो आपला वर्ग शोधू लागला . आखेर शेवटी त्याला त्याचा वर्ग मिळाला . वर्गात ऐंटरी मारताच क्षणी सारे मुलं आपल्या हिरोकडे बघू लागली आपल्या हिरोने तशी कपडेच परिधान केली होती ,बल्यु जिन्स आणि लाल कलरचा टि शर्ट . दारातून ह्याच लक्ष पुर्ण वर्गाकडे गेले जास्त करून मुलींच्या लाईनला!!!मुलांन मध्ये दोन-चेहरे ओळखीचे वाटत होते जे पहिल्या शाळेतुन ह्या शाळेत आले होते . दिग्या त्यांच्या जवळ गेला हाय हैलो झाले व तो आपल्या जागेवर जाऊन बसला , तसा तो मागे बसला होता पण ह्याच पुर्ण लक्ष पाखरू बघण्यात . तशी मुलींची संख्या खुप कमी होती ,फक्त ४च दिसत होत्या .आजून खुप वेळ होता शाळा भरण्यासाठी ,दिग्या मस्त पैकी नविन मित्रांन बरोबर गप्पा मारत होता तेवढयात दरवाजाचा आवाज आला बघतोय तर काय ऐक मनुष्य धापा टाकत दरवाजा जवळ उभा होता . मुलगा होता तो ,अंगाने राक्षसा सारखा तोंड जनु दहा दिवस अंघोळ न केल्यासारखे अंगावर शाळेचा कपडे ते ही चड्डी ढगळी आणि शर्ट ही गबाळ्या सारखा . दिग्याला ते ध्यान पाहुन खुप विचित्र वाटले पण त्याला कुठं माहित होते पुढे हा आपला जानी दुश्मन आणि जिगरी यार होणार होता .