ती आता खरंच बाहुली झाली होती ..
नशिबाच्या इशाऱ्यावर नाचणारी ...बाहुलीचा निर्जीव पुतळा होऊ नये एवढीच इचछा होती ...
गुणगुणत होती आनंदाची गाणी ..
भरवत होती हास्याच्या मैफिली ..मनातल्या वेदना चेहर्या वर उमटू नये एवढीच इचछा होती ...
आजू - बाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती ..
सारे कळूनही नं कळल्याचा दिखावा करत होती ..त्या साऱ्यात स्वतःलाच विसरू नये एवढीच इचछा होती ...
बेभान वाऱ्यासारखी वाहत होती ..
साचलेल्या पाण्या इतकीच संथ होती ..रानात पेटलेल्या वणव्यात जाळून जाऊ नये एवढीच इचछा होती ..
नम्रता उकिरडे
YOU ARE READING
ती आता खरंच बाहुली झाली होती ..
Poetryती आता खरंच बाहुली झाली होती .. नशिबाच्या इशाऱ्यावर नाचणारी ... बाहुलीचा निर्जीव पुतळा होऊ नये एवढीच इचछा होती ... गुणगुणत होती आनंदाची गाणी .. भरवत होती हास्याच्या मैफिली .. मनातल्या वेदना चेहर्या वर उमटू नये एवढीच इचछा होती ... आजू - बाजूला घडणाऱ्...