पुन्हा एकदा जिवनाकडे 💞

13 0 0
                                    

आपण कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी
अश्या आहेत ज्या विसरता येत नाही .😓
त्यांना विसरावे म्हंटले तरी विसरता येत नाही .😐
मृगजळासारखे असणाऱ्या या गोष्टीचा हव्यास मनाला आवरता येत नाही ,आपल्याला माहित आहे की ती गोष्ट आपल्या साठी नाही, तरी पण आपण त्याच्या मिळवण्याच्या नादात आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी,बरेच सुखद क्षण ,आणि बराच वेळ घालवला असतो ,जो पुन्हा परतून येत नाही.😞
मग अशावेळी घरच्यांच्या ,आपल्या माणसाची आठवण येते,प्रेमासाठी तोडलेली नाती पुन्हा जोडविशी वाटतात,
पण त्यावेळी हाती मात्र निराशाच लाभते.😥
मनात नको ते विचार येतात,संपवून टाकावे जीवन ...
पण का संपवावे जीवन,एकदाच मिळणारे हे जीवन पुन्हा सहजासहजी मिळणार आहे का?😬
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटची चढण चढून तो कड्याच्या टोकाशी येऊन उभा राहिला. खालच्या खोल दरीत त्याने डोकावून पाहिले.
बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही.
दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम कायमचा.
त्याने मान वर करून पाहिले.
अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. ☁️
.
.
.
.

.
केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही.
अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत त्याची नजर जाऊन भिडली.
त्या भव्यतेपुढे त्याला त्याचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले.
असा होतो का मी?
पराभव स्वीकारणारा, पळपुटा? कधीच नाही.
संघर्षाला मी कधीच घाबरलो नाही.
मग आज इथे का आलो आहे?
मंद वार्‍याची झुळुक अधूनमधून येऊन सुखावत होती.
त्याला वाटले, आपण एखाद्या गोष्टीत इतके बुडून जातो, की त्याच्या पलिकडे काही जग आहे हेच विसरायला होते.
मनाचे हे घेरलेपण मोडले तर सगळं सोपं होऊन जाईल.
त्याची चूक त्याला आता उमगली होती. 🙂
त्या विस्तीर्ण भवतालाने त्याला काहीतरी शिकवले होते. 😊
त्याच्या चेहर्‍यावरचे मळभ दूर होऊन प्रसन्न स्मित झळकू लागले. आत्मविश्वासाने तो मागे वळून चालू लागला....🙃
पुन्हा एकदा.....जीवनाकडे.💕
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रस्ते बंद झाल्यावर आपण काय करतो,
प्रत्येक जन आपल्या क्षमतेनुसार परिस्थितीचा मुकाबला करतो काही थांबतात, बदलतात, समजुन घ्येतात, ओरडतात, घाबरतात, घबरवतात, पळतात आणि बरयाच इतर प्रतिक्रिया ......
आणि काही लोक नविन रस्ताच बांधायला घ्येतात.

प्रसिद्ध लेखक, कवयत्री 'माया अन्जेलो' आपल्या आत्मचरित्रात ( The Best Advice I Ever Got) तीला तिच्या आजीकडून आयुष्यात मिळालेल्या महत्वपूर्ण सल्ल्याबद्दल सांगते,
"जगाने तुला अशा मार्गावर जबरदस्ती ढकलले जे तुला करायला मुळीच आवडत नाही, जेव्हा तू समोर बघतेय आणि तुला सांगण्यात आलेले गंतव्य (destination) तुला बिलकुल अपेक्षित नाही, आणि जेव्हा तू मागे वळून पाहते तेंव्हा जिथून तू सोडून आली आहेस तिथे तुला मुळीच जायचे नाहीये,
तेव्हा; रस्त्यावरून बाहेर पड आणि स्वतःचा मार्ग बांध".

ज्यांच्या मार्गात दगड आहेत त्यांनी ते बाजूला करायच्या फंदात पडत बसु नका; एवढंच लक्षात असु द्या ...

नविन रस्ता तयार करायला पहिल्या
थरावर हीच दगड कामाला येतील....!

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
wish you a happiest time...(. ❛ ᴗ ❛.)

Вы достигли последнюю опубликованную часть.

⏰ Недавно обновлено: Feb 21, 2020 ⏰

Добавте эту историю в библиотеку и получите уведомление, когда следующия часть будет доступна!

पुन्हा एकदा जिवनाकडे 💞Место, где живут истории. Откройте их для себя