असा ही एक अनुभव

1.4K 7 14
                                    

आज सुध्दा मी कॉलेज करिता जाण्यासाठी निघालो . सकाळी ०८:२० माझी बस असते . नाही म्हणजे हा माझा एका प्रकारचा रूटीन झाला आहे . सकाळी कॉलेज नंतर घरी येऊन थोडा आराम करून संध्याकाळी सहा वाजता टिवशन क्लासेस . एका बारावीत आणि त्यात भर म्हणजे सायन्स . माझे हे दोन वर्ष खूप जास्त महत्त्व होते . त्यामुळे मधल्या काळात मी कुठेही सुट्टी असली की बाहेर जात नव्हतो . घरी राहून फक्त अभ्यास बाकी काही नाही . अहो बाबा एक सरकारी दवाखन्यात कर्मचारी होते . मी अगदी लहान असताना त्यांनी मी एक डॉक्टर होणार आहे हे ठरवले होते . मी पण त्यांच्या खुशीत माझी खुशी मानत होतो . दहावी झाली आणि लगेच मी नीट चां अभ्यास सुरू केला . एकटा असल्यामुळे साहजिकच आई आणि बाबा यांचा खूप लाडाचा आहे .

बसस्टॉप वर येऊन दहा मिनिट झाले होते , बस कधीही. येऊ शकत होती . आज पाहिले लेक्चर मिसेस देशमुख मॅडम यांचे होते आणि त्यांचे लेक्चर मला मिस नव्हते करायचे . मी रस्त्या कडे बघत होतो कधी बस येते . नाहीतर माझी बस ही कधीही वेळेत येत असे मात्र आज खूप उशीर होत होता .

अरे देवा ....... अचानक माझ्या कानावर हा आवाज पडला , मी लगेच आवाज आलेल्या दिशेने बघितले तर एका म्हातारे आजोबा रस्त्याच्या मधोमध पडलेले दिसले . बहुतेक कोणी तरी त्यांना गाडीने उडवले होते . मी लगेच तिथे पोहचलो , माझ्या सोबत आणखी दहा पंधरा लोक पुढे आले . त्या आजोबांना खूप जास्त लागले होते , त्यांच्या उजव्या पायातून मोठ्या प्रमाणत रक्त वाहत होते . माझा हा पहिला अनुभव होता असे काही बघण्याचा . लोक जमा तर झाले होते , मात्र त्यांना मदत करणे सोडून त्यांचा अपघात आपल्या मोबाईल फोन मध्ये व्हिडिओ काढण्यात मग्न होते . शेवटी एका काकांनी त्यांना उठून बाजूला केले . थोड्या वेळात तिथे आणखी दहा एक लोक जमा झाले . प्रत्येक माणूस हा आपला आपला तर्क तिथे माडण्यात व्यस्त होता . मात्र त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात कोणीही समोर येत नव्हते . आजोबा यांच्या पायाला एक कपडा बांधल्यामुळे रक्त आता कमी वाहत होते . मी लगेच माझ्या पाण्याची बॉटल त्यांना दिली . त्यांनी काही सेकंद मध्ये संपूर्ण बॉटल खाली केली . खरं म्हणजे माझे म्हणणे तिथे कोणी ऐकायला तयार नव्हते . अश्या वेळी कोणीही मदत करायला पुढे येत नसतात .

लोक आजोबा यांना काही अजब प्रश्न विचारत होते , ते पुढील प्रमाणे आहेत . जसे की इतक्या सकाळी एकटे कशाला बाहेर पडले , कुठे राहता तुम्ही , तुमच्या जवळ मोबाईल फोन आहे का ??? कशाने तुम्हाला उडवले म्हणजे गाडी होती की काही आणखी वाहन होते , असे लोकांचे प्रश्न सुरू होते .

तेवढ्यात दोन मुली आपल्या चार चाकी गाडीतून खाली उतरल्या , त्यांनी आजोबा यांना बघितले . दोघींनी एकमेकांना बघितले आणि लगेच त्यांनी आजोबा यांना उठवले . आपल्या गाडीत बसवलं आणि जेवढ्या फास्ट त्या तिथे आल्या तेवढ्याच फास्ट त्या तेथून निघून गेल्या .

त्या गेल्या त्या दिशेने मी खूप वेळ बघत बसलो , एक पुरुष असून सुध्दा मी काही करू शकलो नाही . तिथे आजूबाजूला असलेल्या लोकांनी सुध्दा त्यांना दवाख्यानायत नेण्याकरिता काही प्रयत्न केले नाही आणि त्या मुलींनी लगेच त्या आजोबा यांना नेले होते . आजचे जग खूप बदलेले मला जाणवले . अहो स्वार्थी असणे हा माणसाचा गुण असतो , परंतु त्याला पण काही मर्यादा असतात .

हो आजोबा यांच्या मुळे मला देशमुख मॅडम खूप बोलल्या . जाऊद्या येथे मी सुध्दा स्वतःचा विचार करत आहे .....

धन्यवाद.....

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Mar 12, 2020 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

असा ही एक अनुभवWhere stories live. Discover now