कर्ण

40 1 0
                                    

(हस्तिनपूर सोडुन सगळी रथे सैना काम्पिल्य नगरी कडे निघाली...दोन्ही राज्यांमध्ये अहिछत्र नगरी पडत...अश्वदधामा तिथला राजा...नी दुर्योधनाचा मित्र...
काही क्षण आरामा करिता सगळे त्याच्या महाली थांबले...दुर्योधन, कर्ण वतिरीक्त गान्धर नरेश शकुनी,दुश्यासन,दुर्मुख...स्वयंवरासाठी काम्पिल्य कडे जात होते...

रात्रीची वेळ सगळे निजले होते ..कर्ण मात्र जागा होता...आपल्याच विचारात....)

कर्ण ..."(विचारात)भानुमती सारखी प्रिय पत्नी असताना दुर्योधनाचे या स्वयंवरला जाने त्याला पटले नव्हते पण त्यानी हे उघल पणे दुर्योधनाला कळू दिले नाही...तिच्या स्वयंवरात झालेला प्रकार कर्ण विसरला नव्हता...जर दुर्योधनाणे द्रौपदीचा हरण करण्याच्या प्रयन्त केला तर...पण आपण या स्वयंवराला जायचच का ...भानुमती
त्याला पहिल्या नजरेतच आवडली म्हनुन मी त्याचा साथ दिला...एक स्त्री च्या अपहरण करण्यात...मग हे दुसरे लग्न...माझे दुसरे लग्न ही त्याच प्रकारा मुळे झाला होता...वृषाली शीवाय दुसर्या स्त्री चा विचार मी कधीच केला नव्हता ती माझी तेव्हा झाली जेव्हा मी अंगराज नाही राधेय होतो...पण मला सुप्रियाशी लग्न कराव लागल...तिच्या सम्मानासाठी..."

(तितक्यात एक सेवक दुर्योधना च्या प्रवेशाची माहीती देतो.)

दुर्योधना आणि अश्वदधामा प्रवेश करत...

दुर्योधन..."बघ..अश्वद...म्हटले होते ना कर्ण अजुन जागा च असेल..ते..काय मित्रा निद्रादेवी तुज़्या वरही रुष्ट झाली
वाटतेय.."

अश्वदधामा..."आता तर निद्रादेवी त्याच्यावरच प्रसन्य होइल ज्याच्या गळ्यात द्रौपदी वरमाला घालेल.."

(दुर्योधन हसतो...कर्ण कडे बघत ...त्याच्या चहरा वरिल भाव त्याने हेरले...)

दुर्योधन..."कर्ण मी मित्र आहे तूझा ...जाणतोस आपण या स्वयंवराला का जात आहो हे विचारण्याचा अधिकार आहे तुला..(कर्ण दुर्योधनाकडे बघतच राहिला त्यांच्या मनातला त्याला कसं कळलं हे त्याला समजल नाही..)
(दुर्योधन हसत..)मित्रा...तुला अजुनही राजकारण कळल नाही मी हे स्वयंवर मला पत्नी मिळावी म्हनून नाही तर मला दृपदाचे राज्य नी संपती मिळावी म्हणून...सोबतच एक जुना घाव पंण भरायचा आहे..
त्या दृपदनी मला हरवले होते त्या युद्धभूमीत...नी पांडवां नी त्याला ...त्यामुळेच युधिष्ठीराचा युवराज्याभिशेक झाला... आता त्याच्या मुलीशी लग्न करुन मी नेहमी त्याला आपल्या अधिन करेल..."

(कर्णाला त्याच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले होते...आता फक्त एकच दुर्योधन द्रौपदीचे अपहरण करणार का..)

कर्ण..."हूम्ं...त्या युद्धात मी तुज़्या सोबत असतो तर तूझी हार झाली नसती...पण द्रौपदीणे जर तुला वरले नाही तर ...?"

दुर्योधन..."(मिस्कित हसत) त्या युद्धात तू नव्हता पण आता तू माझ्या सोबत आहे !!!"
(कर्णाला जे समजायचे होते ते समजले...)

अश्वदधामा..."तो विचारही करू नको दुर्योधना...पांचाळ राज्य काशी नाही...आणि द्रौपदी...भानुमती...ती एक तर तुला जाळेल नाही तर स्वतःला..."

कर्ण..."या द्रौपदी बद्दल तुला एवढी माहिती कशी ?"

अश्वदधामा.."समग्र पांचाळ त्या द्रौपदी बद्दल काही ना काही बोलत असतात तिच्या मानिनी स्वभावा बद्दल... तिच्या दिसण्या बद्दल...नी तिच्या मित्रा बद्दल..."

दुर्योधन..." मित्र..नी एक स्त्री चा...?"

(दुर्योधना च्या त्या प्रश्नाचा कर्णाला आश्चर्य वाटले..एका सुताला मित्र बनवणारा एका स्त्री ला मित्र आहे यात आश्चर्या वाटले.)

अश्वदधामा..."हो मित्र आणि तोही द्वारिकाधिश श्रीकृष्ण...खरे तर ज्याला ती वरेल त्याला फक्त पांचाळ च नाही तर द्वारिका ची मित्रता लाभेल नी नारायनी सेनेची शक्ती पण...म्हनुन म्हटले मित्रा त्या द्रौपदीच्या हरणाचा विचार देखील करू नको..."

दुर्योधन..."मग तिने मला वरावे यासाठी काय करू शकतो..."

अश्वदधामा..."हे तिच्या हाती नाही...या स्वयंवराचा एक प्रण आहे जो तो पुर्ण करेल त्याच्याशीच द्रौपदी विवाह करेल.."

कर्ण..."प्रण...कसला?"

अश्वदधामा..."ते काही ठाऊक नाही...पण हा प्रण फक्त एक धनुर्धर पुर्ण करू शकतो असे म्हणतात..."
(अश्वदधामाने  बोलत बोलत आपला हात कर्णाच्या खांदी ठेवला...)

कर्ण..."मला ना द्रौपदीत रुची ना तिच्या संपतीत..."

अश्वदधामा..."द्रौपदीला न बघता असे म्हणणे योग्य नाही...तिच्या सारखी सौंदर्यवती या पृथ्वीतळावर नाही..."

कर्ण..."मग तू स्वयंवरामधे भाग का नाही घेत...तू ही एक उत्तम धनुर्धर आहे"

अश्वदधामा..."ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे...माझ्या बहिनी सारखी..."

दुर्योधन..." खुप झाला  हा द्रौपदी पुराण आता स्वयंवरातच बघु जे होइल ते..."

(दुर्योधन नी अश्वदधामा आपापल्या कक्षा कडे वळले...कर्णही तबकात मुकुट ठेऊन पलंगा कडे वळला...पण द्रौपदीचा विचार त्याच्या डोक्यातून गेला नाही...की प्रण चा...)

Karn Draupadi - If They TalkDonde viven las historias. Descúbrelo ahora