द्रौपदी

41 1 0
                                    

(सगळी कडे स्वयंवराची तैयारी सुरु होती...रोज रोज नव नविन व्यापारी पोशाख ,दाग दागिने घेऊन राजमहली येत...अनेक राज्यातील राजे,युवराज पांचाळ सीमेवर पोहोचले होते...त्याच्या स्वागता साठी स्वतः युवराज धृष्टद्द्युम्न करित होते...

  राजमहली राजकुमारी द्रौपदी च्या कक्षेत दास दासिंची वर्दळ सुरु होती...स्वयंवरात कसं वागावे या बद्दल एक मुख्य दासी वृन्दा तिला सांगत होती...

वृन्दा..."सभेत प्रवेश करताना आपले डोळे खाली असू द्यावे कोणाही कडे न बघता सरळ महाराजांकडे जावे नी आपल्या जागे वर बसावे..."

(द्रौपदी हसते ...)
द्रौपदी..." वृन्दा जर आम्ही खाली बघून चालली तर मला कसे कळेल की स्वयंवरात कोन कोन आलेय ते?"

वृन्दा..."त्या साठी स्वयंवरा ची प्रतिक्षा कशाला आम्ही सांगतो..."
( तिने एक प्रत्रिका काठली त्यात स्वयंवरात येण्यार्या राजकुमारन्चे नावे होती...नावे घेतांना एका  नावा  वर वृन्दा थांबली द्रौपदी च्या तिश्न नजरेने ते हेरले...नी नाव होते दुर्योधन)

द्रौपदी..."दुर्योधन...पांडवांची हत्या यानेच केली ना...?
"
वृन्दा..."ते तुम्हांला जाणण्याची गरज नाही कुमारी...हे  कट्यार घ्या जर त्या दुर्योधनानी तुम्हाला स्पर्श केला तर याने कापा त्याला..."

(वृन्दा चा असा रुप तिने कधी बघितला नव्हता...त्या कट्यारिचा अर्थ तिला कळला नाही...)

द्रौपदी..."का? पिताश्री  भ्राताश्री असतांना त्याची येवढ़ी हिम्मत..."

वृन्दा..."ही हिम्मत त्याची नाही त्याच्या मित्राची... अंगराज कर्णाची..."

(वृन्दा नी भानुमती स्वयंवरात जे घडले ते द्रौपदी स सांगितलं...द्रौपदी अपराधी पैक्षा त्याचा साथ देणारास अधिक दोषी मानत...)

(न कळत अंगराज बद्दल तिला राग आला...)

एक दासी श्री कृष्ण आल्याची वार्ता घेऊन आली...
(सखा कृष्ण आलेत ही बाब ऐकत्याच द्रौपदी सभे कडे धावली...)

स्वयंवर मंडपात वासुदेव कृष्णा नी आणलेला धनुश मधोमध ठेवला होता त्याचा पुढे एक यंत्र तैयार करण्यात खुद्द श्री कृष्ण  करित होते..

मंडपा च्या दाराशी द्रौपदी हे बघून थक्क झाली...एवढा मोठा धनुश तिने कधीच बघीतला नव्हता...

द्रौपदी..."हंम्म्... या धनुश्या वर जो राजकुमार प्रतिन्जा चढवेल त्याच्याच गळ्यात राजकुमारी द्रौपदी वरमाला घालेल...(आपल्या खोचक नजरेने तिने कृष्णा कडे बघीतलं..पण त्याच्या काही लाभ झाला नाही)
(द्रौपदी चीडून)
सखा...काही वेगळ असायला हवं..थोडं कठिण..."

कृष्ण..."ओह्ह राजकुमारी मग याला काय म्हणावं, (बाजूला सरकत कृष्णाने तिला यंत्र दाखवीले...
यंत्राच्या मध्य भागी मछली होती त्या खाली एक मोठ्या  पात्रात तेल ठेवले होते...कृष्णाच्या ईशार्यावर ते यंत्र फिरवण्यात आले...) त्या धनुशा वर प्रतिन्जा चढवण्या पर्यंत बरोबर होते पण खरी परिक्षा एथे आहे...या पात्रात  या मछलिचे प्रतिबिंब भघुन तिच्या नेत्रास भेदायचे...आणि जो हे करेल त्याल्या तू वर्शिल..."

(द्रौपदी ने एकदा पात्रात नी एकदा त्या मस्सास बघितले..)

द्रौपदी..."(कृष्णा कडे वळुन) कठिण म्हणणे...अशक्य असे नाही..."

कृष्ण..."(हसत) कृष्णे...तुला काय वाटतं...या भुमिवर वीरांची कमी आहे...हा लक्ष आर्य व्रतातील पांच योध्या पुर्ण करू शकतात..."

द्रौपदी..." तुला सोडुन गुरु द्रौण आणि भीष्म...ते दोघ् ही माझ्याशी विवाह करणार नाही बाकी...अर्जुन...(अर्जुन नाव घेताच द्रौपदी चा चेहरा उजळला)"

कृष्ण..."हंम्म् तो जिवंत असता तर त्यानी हा लक्ष भेदला असता..."

द्रौपदी..." मी जिवित आहे म्हणजे अर्जून पण जिवित आहे...माझा जन्म त्याच्या साठी झाला पिताश्रीनचि हिच
ईच्छा...नी ती पुर्ण करने माझा धर्म..."

कृष्ण ..."तो जिवित असेल पण आधिच कोणी लक्ष भेद केला तर ...त्या पाचव्या यक्ती ने अंगराज कर्णाने"

द्रौपदी..." मग त्याला माझ्या मार्गातून हटावे लागेल..."





Karn Draupadi - If They TalkTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang