मंडपात प्रवेश करीत...
सम्पुर्ण सभागृह अनेक देशातील राजा राजकुमारानी भरुन गेले होते.त्यांच्या साठी दुतर्फा आसान ठेवले होते.
एका बाजूला ब्रांम्हण बसले होते. पांचाळ राज्याची समृद्धि या सभागृहा वरुन लावण्याचा प्रयत्न कर्ण करीत होता तितक्यात त्याची नजर मंडपाच्या मध्य भागी ठेवलेल्या मंचकावर पडली त्यांच्या सरळ रेषेत एक यंत्र होते.त्या सगळयांचा ऊद्देष समजण्याचा प्रयन्त तो करत होता ईत्क्क्यात महाराज दृपद त्याच्या युवराजान सोबत
प्रधारले नी त्यांच्या पाठोपाठ स्वयंवराचे मुख्य अथिति द्वारिकाधीश श्री कृष्ण आणि त्याचे थोरले बंधू बलराम आले.कृष्णाची नजर आपल्यालाच बघत...असे त्याला वाटू लागले...त्याने हे दुर्योधनास सांगितले...
दुर्योधन..."तो गवळी...त्याची नजर कमळ नयनी त्याच्या कडे जो बघतो त्याला असेच वाटते...आता त्याल्या सोड नी ईकडे बघ... राजकुमारी येईलच..."
(एका सेवकाने राजकुमारी येण्याची दिली.
कर्णाची नजर आप्चुक प्रवेशद्वाराकडे वळली सेवकाच्या आरोळी पेक्षा त्याला नुपुरांचा आवज एकू येत होता...
द्रौपदीच्या सौंदर्या बाबत जेवढे एकले होते त्यात कमी त्याला वाटु लागले...पण वृषालीचा विचार येताच त्याने त्याची नजर खाली केली.
(द्रौपदी एक एक पाऊले थकीत सभेच्या मधोमध असलेल्या मंचका जवळ आली तिने त्या वरील कपडा हटीवला नी एक मोठा धनुश सगळ्या समोर आला...द्रौपदी ने त्यास नी उपस्तीत आदरणीय व्यक्तीस प्रणाम केला आणि आपल्या स्थानावर येऊन बसली...)
युवराज स्वयंवरा ची परिक्षा सांगितली...
दुर्योधन..."पात्रात बघून मछलीचे नेत्र भेदयायच? कठिण आहे."
कर्ण..."येवढे नही जेवढ दिसत आहे..."
दुर्योधन..." धनुर्धर कर्णाला नक्किच नाही..."
(कर्ण फक्त हसतो...)
(एक एक करत सगळे राजे परिक्षेत हरत होते...पांचाळ राजाची चिंता वाढत होती...कोन हरतेय...कोन परिक्षेत पुढे येत आहे या कडे तीळ मात्रही लक्ष नसलेली पांचाली आपल्या पदराशी चाळ्या करण्यात व्यस्थ होती...)
सेवकाने कुरु राजकुमार दुर्योधनाचे नाव घेतले...
दुर्योधनाच्या नावा सोबत पांचालीचे चाळे थांबले नी तिची नजर कृष्णा कडे वळली...त्याच्या चहेर्यावरिल हास्य बघून ती पुन्हा आपल्या कामत लागली...
दुर्योधन परिक्षेत भाग घेण्यासाठी पुढे आला...त्याने अगदी सहज ते भव्य धनुश एका हातात उचलले...
त्याच्या सारख्या बलवीराला ते सहज होते...नी पात्रा कडे वळला...
पण पात्रातले प्रतिबिंब त्याला दिसत नव्हते.तरिही लक्षाकडे तो एकाग्रपणे बघत होता तित्क्यात एका हास्यानी त्याची एकाग्रता भंगली नी त्याच्या हातातील बाण सैरभैर हाऊन सभेच्या छताला भेदला...दुर्योधनाची हार भघुन कर्ण आसना वरुन उठला...
सेवकाने त्यांच्या नावाचा उल्लेख केला तसेच द्रौपदीचे लक्ष श्रीकृष्णा कडे वळली त्याच्या चहेर्यावरिल हास्य विरले होते...तिच्या दासीन्नि भानुमति स्वयंवरात जे घडले ते तिला सांगितले होते कसे या सुतपुत्राने त्या राजकुमारिचा अपमान केला...
हा लक्ष भेद करू शकतो...मग अर्जून आले तर ...या विचारांनी तिचे मन भांबावले...
कर्णाने सहज धनुशास उचलले...नी पात्राकडे वळला नेम धरत त्यांने लक्षाकडे बघितले तितक्यात एक स्री समर्थ आवाजाकडे त्याचे लक्ष गेले.
"मी सुतपुत्राला वरणार नाही"...
ESTÁS LEYENDO
Karn Draupadi - If They Talk
De Todoमहाभारतातील पात्र कर्ण द्रौपदी कधी एकमेकांशी बोलले असते तर....