सेवक - Part 1

17.4K 29 7
                                    

"वॉव ...सहीच... समीर... काय जागा आहे रे... मला जाम आवडली. आपण तर इथे हनिमूनला आल्यासारखी दोन वर्षे घालवू." तृप्ती तिच्या नवऱ्यासोबत एका जुन्या पण आलिशान बंगल्या समोर उभी राहून बोलत होती.

समीर आणि तृप्तीचे लग्न ६ महिन्यांपूर्वी झाले होते. समीर सिव्हील इंजिनिअर होता. कंपनीने त्याला एका इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट साठी नैनितालला जायची ऑर्डर दिली. नुकतेच लग्न झाले आहे हे कन्सिडर करून त्याच्या कुटुंबाची राहायची व्यवस्थापण कंपनीनेच एका लीजवर घेतलेल्या बंगल्यामध्ये केली. बंगला रिमोट जागेवर होता. आजूबाजूला भरपूर झाडी होती. समीर आणि तृप्ती आनंदाने तयार झाले. कारण सर्वांपासुन लांब तेपण २ वर्षे एवढा मोठा हनिमून कोणालाही नसेल मिळाला. वरवर दोघेही दाखवत होते कि कुटुंबापासून किती दिवस लांब राहावे लागणार वैगरे. पण मनातून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सगळे पॅकिंग वैगरे करून दोघेपण नैनितालला आले. तिथले स्वर्गीय वातावरण पाहून तृप्ती खूप खुश झाली. तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून समीर पण खुश होता. तृप्तीमुळे कामाचे टेंशन कमी होण्याची त्याला खात्री वाटली.

बंगल्यासमोर उभे राहून दोघांचा हा संवाद चालला होता. तितक्यात मागून आवाज आला. "राम राम हजुर ..."

दोघांनी दचकून मागे पहिले. एक ६0 - ६५ वयातला म्हातारा उभा होता. त्याने मळकट ट्रॅक पँट आणि वरती शर्ट घातला होता. डोक्याला कानटोपी लावली होती. डोळे खोल गेले होते. त्वचा उन्हात काम करून रापली होती. गालफाडे बसलेली होती. चेहरा कारुण्याने ओथंबलेला होता.

"भुरेलाल. नाम हमारा. रसोईया ओर नौकर." कसनुसं हसत त्याने परिचय दिला.

समीरला आठवले. हा केअर टेकर होता. त्या बंगल्याच्याच बाहेरच्या खोलीत राहात होता. म्हणजे हा इथे मदतीला असणार होता. तृप्तीला आराम पडेल याच्या असण्याने.

"अच्छा... ओके. भुरेलाल. बताया गया था मुझे पाहिले." समीर म्हणाला.

तृप्ती त्याला मागे खेचत म्हणाली, "समीर. अरे काय हे.. कसला म्हातारा आहे तो. कशाला हवा आपल्याला. मला काय काम आहे इथे. आपल्या दोघांचेच तर करायचे आहे. नको उगाच आपल्या प्रायव्हसी मध्ये कोणाची दखल." त्याला पाहून ती जरा वैतागलीच होती.

सेवकDonde viven las historias. Descúbrelo ahora