aditya290593
मालिकेची कथा सायली (जुई गडकरी) आणि अर्जुन (अमित भानुशाली) यांच्याभोवती फिरते. सायली ही एका आश्रमात वाढलेली, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी मुलगी आहे, तर अर्जुन एक यशस्वी आणि शिस्तप्रिय वकील आहे.
दोघांची परिस्थिती आणि स्वभाव पू र्णपणे वेगळे असूनही, काही विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना एकमेकांसोबत 'करार लग्न' (Contract Marriage) करावे लागते. सुरुवातीला केवळ एका करारापोटी एकत्र आलेले सायली आणि अर्जुन हळूहळू एकमेकांच्या जवळ कसे येतात, त्यांच्यातील नाते कसे बदलत जाते आणि सायलीच्या भूतकाळातील रहस्ये कशी समोर येतात, यावर मालिकेचे कथानक आधारित आहे.