AnandPranay
- Reads 6,990
- Votes 42
- Parts 4
क्राईम ब्रॅंचचा सब-इंस्पेक्टर, विलास भोसले डान्स बार मालक, अण्णा शेटटीच्या केबीनमधील खिडकीतून समोर पहात होता. समोर डान्स फ्लोअरवर डान्सर, माया नाचत होती आणि विलास तिला हपापलेल्या नजरेने न्याहाळत होता.... अण्णा शेटटी टेबलच्या मागे त्याच्या चेअरवर बसून आपल्याच तंद्रीत कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होता...
इंस्पेक्टर विलास नाईट ड्युटीवर होता. आज त्याचा असिस्टंट, कॉन्स्टेबल गावडे रजेवर होता तेव्हा तो एकटाच 'रात्रीची गस्त' घालत होता. रुटीन चेकींग करत करत तो त्या बारमध्ये आला होता. आता आलोय तर बार मालक, अण्णाला भेटून 'हप्ता' वगैरे वसूल करून जावे ह्या विचाराने तो अण्णासमोर बसला होता... नेहमीप्रमाणे अण्णाने त्याला रमचे २ पेग पाजले होते... ड्युटीवर असताना खरे तर तो पित नसे पण अण्णाच्या बारमध्ये आले की त्याला पिण्याची हुक्की यायची....
त्याला कारण त्याच्या बारमधली डान्स