Terror Attack at Dombivli Station
13 parts Complete दहशतवादी हल्ला! एक असा विषय, जो अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक स्तरावर एकोपा वाढवा या दृष्टीने अनेक माध्यमांतून लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. सद्भावना, आपुलकी वाढावी म्हणून अनेक स्तरांवर प्रयत्न सुरु असले, तरीही दहशतवाद वाढतच चालला आहे. हे दहशतवादी एक-दोन दिवसांत तयार होत नाहीत, क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या त्यांच्या मनात लहानपणापासून या गोष्टी बिंबवल्या जातात. आपला देश, धर्म, जात किंवा जे काही आहे, ते संकटात आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे, आपण दुर्लक्षित आहोत, आपल्यासोबत असं झालं, तसं झालं, बरंच काही असतं. मग आता अन्यायातून मार्ग काढण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं, आपण सूड घ्यायचा. (बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावर एक वेगळंच पुस्तक प्रकाशित करावं लागेल.) अशा सर्व गोष्टींच्या प्रभावातून दहशतवादी तयार होतो. मग आपला