आपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला असता, जर मी हे सर्व ठरवून केलं असतं.
दरवर्षी १ मे या तारखेला मी माझं एक तरी पुस्तक प्रकाशित करेन असं ठरवून मैत्र जीवांचे (२०१३), महाराष्ट्राचे शिल्पकार (२०१४), अग्निपुत्र (२०१५), पुन्हा नव्याने सुरुवात (२०१६) असे पुस्तक प्रकाशित झाले देखील. २०१७ साली टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना म्हणून त्या कादंबरीचं पहिलं प्रकरण प्रकाशित सुद्धा केलं, आता फक्त ट्रेलर बनवायला आणि मार्केटिंग करायची बाकी असताना मी ते पुस्तक वाचले. माझी लेखनशैली त्यात हो