प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्य ानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो.
अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!!
* कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.