प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?All Rights Reserved