1 part Complete २०२० चा मार्च महिना होता. मंगेश, अभिजित, सुमित हे तिघे पुण्यावरून अविनाशकडे मुंबईला आले होते, २ आठवड्याच्या सुट्टीवर, तिथून मग गोव्याला जायचा प्लॅन होता. आणि नेमकी मार्च एंडिंगला टाळेबंदी झाली. कोवीडमुळे त्यांचा प्लॅन फिस्कटला, त्यांचा मूड ऑफ झाला. टाळेबंदी घोषीत करून एक आठवडा झाला. हे चौघे मित्र अविनाशच्या वन रूम किचन मध्ये राहत होते. चौघेही एवढे वैतागले होते की ते एकमेकांना शिव्या आणि दोष देत होते. तुझ्यामुळे अडकलो, तरी मी सांगत होतो, मला वाटलंच होतं वगैरे वगैरे. त्यात विरंगुळा म्हणून चौघे पत्ते खेळू लागले, अगदी दिवस रात्र. अशाच एका कंटाळवाण्या दुपारी चौघे पत्ते खेळत होते, तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते