माझ्या स्वप्नातील 2030 च्या भारतात भारत देशाला कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज असायला हवी. भारत देशाकडे भारतीय संपूर्ण युद्धसाहित्य असायला हवं. सन 2030 च्या भारतात माझ्या भारतातल्या सगळ्या मुली, स्त्रिया या संपूर्ण रितिने सुरक्षित असायला हवे, त्यांना सर्व हक्क मिळायला हवे. माझ्या स्वप्नातील 2030 च्या भारतात सगळ्यांना म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षण व नोकरी मिळायला हवी. सर्वात महत्त्वाचे माझ्या भारतातील भ्रष्टाचार हा संपूर्ण नष्ट व्हायला हवा. माझ्या स्वप्नातील 2030 च्या भारतात तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेला भारत, सु संस्कृतीने संस्कारक्षम असलेला भारत, सुशिक्षित जैविक शेती ने भरभराटीस आलेला भारत, सुशिक्षित तरुणांच्या बळाने स्वतः च प्रबळ प्रबळ स्थान निर्माण करणारा भारत, धर्मनिरपेक्ष, जातीपातींच्या विचारांना आहुती द