2020 हे वर्ष अगदी वाईट तर गेलेच पण, या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवले.तर या वर्षात आपण सगळ्यांनाच कोरोना ने त्रस्त करून ठेवलं होतं .खरंतर हा कोरोना पहिले चीन या देशात आला होता. तेव्हा बिनधास्तपणे बातम्या बघत मी म्हणायचे," अरे हा करो ना काही भारतात यायचा नाही" पण हळूहळू तो भारतात आलाच.मग भारताचे पंतप्रधान यांनी 22 मार्च रोजी कर्फ्यू जाहीर केला. त्या दिवशी घरात बसूनच राहावं लागलं. तेव्हा कंटाळा आला पण मग कळालं या धावपळीच्या जगात मनाची शांती किती महत्त्वाची आहे. याचा अनुभव आला. त्या दिवसानंतर एक तास तरी वेळ काढून मनःशांती करायची ठरवलं. त्यानंतर कधी ताट वाजवून तर कधी, मेणबत्ती घेऊन भारताचे नागरिक असल्याचा हक्क गाजवला. जे माझे जवळचे लोक होते त्यांना भेटायची इच्छा फार व्हायची .पण काही करता मी त्यांना भेटू शकत नव्हते.पण तेव्हा च मला जवळच्या माणसाची किंमत कळाली.त्य