सोशिअल मीडिया ने आज काल आपल्या आयुष्याला असे गुरफटत चालले आहे कि आपण आपल्या आयुष्यातल्या सोशिअल मीडिया वरच्या मित्र मैत्रिणींनाच खरे मानू लागलो आहोत...
हि कथा मनात येण्याचे कारण मी तुम्हाला सांगते...
सोशिअल मीडिया वर मला हि असेच कोणी तरी भेटले, सुरवातीला फक्त कथेविषयी गप्पा सुरु होत्या, आणि न कळतच आम्ही एक दुसऱ्या बद्दल जाणून घेऊ लागलो... खूप गुंतत गेले मी, खरं म्हणजे इतकं गुंतण्याला कारण होते, माझ्या कॉलेज च्या फ्रेंड्स ला मिस करत होते... त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, ते हसणे ते बेफिकीर जगणे... आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले सोनेरी क्षण असतात कॉलेज चे...
असे जिवाभावाचे मित्र नाही रोज रोज भेटत...
मी हि माझ्या जिवा भावाच्या मैत्रिणीला खूप मिस करते... टच मध्ये आहोत असेच एक दुसऱ्याच्या मनात... खात्री आहे कधी एक दुसऱ्याला नाहीं विसरणार... पण परत कधी भेटणार ह्याची शाश