आता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा हात थरथरु लागला आणि पत्ता तिच्या हातुन खाली डेव्हिडसमोर पडला. तो "डेथ कार्ड" म्हणजे साक्षात मृत्युचा पत्ता होता. त्या पत्त्याच्या पाठीमागे काळे घोंगडे पांघरलेला एक अतिशय विदृप सांगाडा पांढ-या घोड्यावर बसुन येत असल्याचे चित्र कोरले होते. डोळ्यांच्या खोबण्या आणि चेह-याच्या ठिकाणी फक्त कवटी दिसत होती. त्या सांगाड्याच्या उजव्या हातात घोड्याची लगाम व डाव्या हातात चौकोनी आकाराचा जीर्ण झालेला काळा झेंडा होता ज्यावर सैतानी स्वरुपाची नक्षी कोरली होती.All Rights Reserved