प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स
जगावं त्या एका व्यक्ती साठी
तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी
तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी...
नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई
भावना मात्र एकच...
कधी हसणार आहे... कधी रडणार आहे...
मी सारी जिंदगी माझी... तुला जपणार आहे!!!
तर अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असते, ते नातं म्हणजे तुमचा श्वास असतो... जस श्वास नाही तर आपण नाही तसं ती व्यक्ती नाही तर आपण नाही...
आपल्या आयुष्यातला श्वास शोधला आहे का मग तुम्ही? कोणासाठी, कोणासोबत तुम्हाला हसावे, रडावे आयुष्याचा प्रत्येक क्षण जागावासा वाटतो... त्या व्यक्तीला जपा... अश्याच नात्यांना उलगडण्याचा माझा हा एक प्रयत्न...
तुमच्या अपेक्षांना खरी उतरेल माझी लेखणी ह्या अपेक्षेत!
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?