2 parts Ongoing अध्यात्म व तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्नांची उत्तरे देणारे ग्रंथ मराठी वाङ्मयात फारसे आढळत नाहीत. 'काळाराम ते केदारनाथ' या आत्मशोधाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. आयुष्याचे ध्येय काय असावे, आनंदप्राप्ती कशी होते, जप, तप, आहार, विहार, संन्यास, साधना ह्यांचे आध्यात्मातील महत्त्व, रोजच्या जीवनात षङ्रिपूंवर विजय मिळवून प्रेमाने कसे जगावे हे व यासारखे असंख्य प्रश्न सर्वसामान्य वाचकाला पडत असतात. ओढ शाश्वत अनुभूतीची हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आत्मियतेने केला आहे.
अत्यंत सरळ, सोप्या व सुलभ भाषेत, रोजच्या जीवनातील रेडिओ, नळ, बुलडोझर, लाकूड, अग्नि, समुद्राच्या लाट