वय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका लहान वयातच काय काय बघायला मिळेल हेच तुमच्यासमोर मांडणे माझ्यासमोरचा आव्हान आहे. पुस्तकाच्या शेवटी ते मी पार पाडले कि नाही हे समजेलच. जरी ते पार पाडले गेले नसले तरीही तुमचे फक्त मनोरंजनच व्हावे ही माझी अपेक्षा आहे.
तशी ही कहाणी 2012 वर्षाची आहे. जेव्हा सर्वच जण मोबाइल नाही वापरायचे. वापरले तरी त्यातील बॅलेन्स हे बँके त ठेवलेल्या मौल्यवान पैसांसारखे असायचे. त्यामुळे प्रत्येक कॉल किंवा मेसेज साठी विचार करून पैसे मोजायला लागायचे.
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती वडिलांबद्दल कोणालाही काहीही विचायचे नाही म्हणून. पण प्रकाशची खूप इच्छा होती..वडिलांबद्दल जाणून घेण्याची..त्यांना भेटण्याची. त्यांची पण इच्छा असेल का आपल्या मुलाला भेटण्याची? आणि ती पूर्ण होऊ शकेल का?