एक माणूस म्हणून आयुष्यात काय हवं असत..? पूर्ण सॅटिसफॅक्शन... तृप्तता. मग ती पैशाच्या बाबतीत असो वा भावनांच्या वा स्वप्नांच्या वा शारीरिक सुखाच्या... तृप्ततेच्या मृगजळाच्या मागे धावताना माणूस आपोआप त्या मोहजालात अडकत जातो. आणि सुरु होतो एक खेळ...ना त्या मृगजळातून बाहेर पडावस ना आत रुतून जावंस. हि कहाणी आहे त्या ब्रह्मचारी तरुणाची ज्याला मोहमायेपासून कोसो दूर राहण्याची इच्छा आहे. आणि ती... तिला आपल्या अपूर्ण अतृप्त आयुष्याला पूर्णत्वाने जगायचंय. पण एकाच समाजात राहून, समाजाची बंधन झुगारून जगणं जमेल का त्यांना..?