1 capítulo Concluído पावसापासून बचावाचे सगळे साहित्य मंदारकडे गाडीत उपलब्ध होते. घाटातील रस्त्यावर बराच काळ आणि बरेच अंतर मंदार एकटा होता. इतर वाहने उशीर झाल्यामुळे चिडून घाईने निघून गेली. एखाद दुसरे तुरळक वाहन आजूबाजूला पुढे मागे दिसत होते. उजव्या बाजूला दरी होती आणि डाव्या बाजूला मोठा डोंगर होता. साडेअकरा पर्यंत नक्की मुंबईला पोचू शकणार होता. त्यामुळे मुंबईत वीरचंदानी आणि दुबईतील पार्टी वाट बघत हॉटेलमध्ये थांबणार होते. मंदारने त्यांना जेवून घ्यायला सांगितले होते. मंदार कधीही वेगाने गाडी चालवत नसे. उशीर झाला तर हरकत नाही परंतु एक्सीडेंट करून स्वतःच्या किंवा इतरांच्या नाशाला कारणीभूत व्हायचे नाही! उजव्या बाजूच्या दरीमधून एका स्त्रीचा आधी कपाळ, मग चेहरा आणि हात, थोडा थोडा वर आला आणि हळूहळू संपूर्ण स्त्री घाटावरील रस्त्यावर चढली. ती एक सुंदर, पंचविशीत असलेली स्त्री ह