नमस्कार मंडळी, मी एका खेडेगावात राहणारी मुलगी .माझ्या अंगी तशा नृत्य, गायन, मेहंदी काढणे, मेकअप करणे अशा नानाविध कला उपजतच होत्या.दिसायला फार आकर्षक असल्याने खूप प्रपोजल यायची परंतु मी कधी कुणाला दाद दिली नव्हती कारण माझ्या आईने मरताना एक अट घातली होती पोरी लग्नाआधी कसला व्यभिचार करू नको आणि आमिषाला बळी पडू नकोस.आणि माझ्या नावाला कलंक लावू नकोस . या जगात प्रेम फक्त क्वचितच भेटेल पण त्यामागे वासना ठिकठिकाणी भेटेल..म्हणून मी या गोष्टीपासून नेहमी लांब राहिले..तसं माझं लग्न पंचविशी मध्ये झालं आणि मी शहर वजा गावात सासरी नववधू बनून आले आणि बघता बघता संसार रुपी वेलीवर एका गोंडस मुलीची आई देखील झाले.नवरा रिक्षा व्यवसाय करायचा आणि मी घरीच असायचे. तसं पाहता एकट्याच्या कमाईत घर चालवताना खुप ओढाताण व्हायची ..कधी कधी तर नुसती भाताची पेज पिऊन दिवस जायचा.