22 parts Complete एक अशी कथा, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे.
पुस्तकाबद्दल बोलण्याआधी माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. लहानपणापासून संशोधक होण्याची इच्छा म्हणून भरपूर पुस्तके वाचून काढली. अनेक संशोधकांचे चरित्र वाचले. सर्वकाही सुरळीत चालू होते आणि त्यातच मिलिटरी स्कूलमध्ये शेवटच्या वर्षी माझा अपघात झाला. नंतर रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला आणि माझी बरीच स्वप्ने धुसर झाली. जास्त धावू नये, जास्त वजन उचलू नये अशी अनेक बंधने माझ्यावर आली. संशोधनात काही करता आले नाही याचा खूप त्रास होत होता. संशोधनातून काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आण