ह्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करतो. कितीही त्रास होत असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करुन कामे आटपत असतो. घरी आल्यानंतर मात्र तो त्रास सहन करणे मुश्किल होते. वेळही अशीही असते की डॉक्टरकडेही जाता येत नाही.
आपण मात्र अनभिज्ञ असतो की आपल्या स्वयंपाक घरातच मेडिकल उपलब्ध आहे हे ठाऊक नसते. कित्येक उपाय असे आहेत की ज्याकरिता डॉक्टरकडेही जाण्याचीही गरज भासत नाही.
माझ्या वाचनात आलेल्या, उपलब्ध झालेल्या माहितीचे एकत्रिकरण ह्या पुस्तकात करण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र हे उपाय करताना आधीच्या इतिहासाचा विचार करुन ह्याचा उपयोग करावा जसे की एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असल्यास तो उपाय टाळावा, सुचविलेल्या उपायाचा फायदा जाणवत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इंदधनुष्यात सात रंग असतात नेमके हे सात रंग जर आपल्या सारख्या कॉमन माणसाच्या जीवनात आल्यावर जीवन कसे सुखी होईल याची मजेशीर शृंगारिक कथा आहे. नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय कमेंट किंवा चाट मध्ये द्या.