मी पाहिलेले कोविड वॉरियर

77 2 4
                                    

"करोना व्हायरस" हा व्हायरस विषाणूंचा गट आहे. या व्हायरसमुळे पक्षांना आणि प्राण्यांना सुद्धा रोग होतो. करोना व्हायरस ची लक्षणे आहेत, ताप ,थकवा आणि कोरडा खोकला. आपण आपली काळजी करोना व्हायरस पासून कशी घेणार.
१) मासक घालायचा
२) स्वच्छता राखायची
  ३) बोलताना कमीत कमी तीन फुटाचे अंतर     ठेवायचे.

अशा बिकट परिस्थितीत सुद्धा डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले योगदान दिले . त्यांच्या या सहयोगामुळे, आज आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत. या सर्व समाज सेवकांना आपण आपले "कोविड हिरो" मानतो. कोविड हिरो दिवस-रात्र सेवा करतात आणि या सर्व कोविड योद्धांना माझा मानाचा मुजरा.
‌      कोविडच्या सुरवातीच्या काळात सामाजिक आणि मानसिक परिस्थिती ढासळली होती आणि सर्वत्र लॉकडाऊन म्हणजे म्हणजे संचारबंदी लागू झाली होती. मी ,माझी आई, माझे आजी-आजोबा सर्व घरातच सुरक्षित होतो, कारण माझे बाबा आम्हा सर्वांच्या गरजा  पुरवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करत होते. आमच्या शाळेच्या ऑनलाईन पद्धतीसाठी आम्हाला लागणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वेळेत उपलब्ध करून देणे किंवा आजोबांसाठी डॉक्टर भेट घेणे सर्व काही तेच करत होते .  घरातील सर्व बाहेरची  दैनंदिन कामे त्यांनी व्यवस्थितपूर्ण पार पाडली. घरातील  इतर कामांची कधीही सवय नसलेले, माझे हे बाबा, आता ऑफिसचे काम आणि घराची सर्व जवाबदारी सांभाळून घेताना दिसत होते. त्यांनी घेतलेल्या सावधगिरी मुळे आणि सरकारी सुचनांचे पालन केल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही आज सुखरूप आहोत . बाहेर जाताना आणि बाहेरून येताना त्यांनी खूप सावधानता बाळगली . असे हे माझे बाबा,  "मी पाहिलेले ले  कोविड  योद्धा आहेत".

धन्यवाद!!

वैदेही स्वप्निल दळवी
कक्षा -आठवी
रिलायन्स फौंडेशन स्कूल

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 15, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मी पाहिलेला कोविड योद्धाWhere stories live. Discover now