२०२० साला मधील माझे अनुभव आणि येणारे २०२१ साल अधिक चांगले होण्यासाठीच्या माझ्या

42 1 0
                                    

           आले कोरोनाचे संकट असले
           झाले होत्याचे ही नव्हते
            तंत्र सारे बिघडले असे की
            सारेच चार भिंतीत अडकले
       २०२०!! कोणत्याही कळत्या वयाच्या मुलालाही कायम लक्षात राहील असं वर्ष! आमचं शालेय वर्ष संपायच्या आधीच या कोरोना ने अख्ख्या जगाला वेठीस धरले.
            मार्च महिन्यात आमची शाळा दोन दिवस सकाळी लवकर होती. आणि त्यादिवशी शनिवार होता.आम्ही खूप धमाल केली. पण हे नव्हत माहित की दुसऱ्या दिवसापासून शाळेला सुट्टी आहे.प्रार्थनेच्या वेळी शिक्षक म्हणायचे की आता कोरोना खुप वाढत आहे.मग एकेदिवशी तर सुट्ट्याचं लागल्या.खूप आनंद झालेला पण नंतर तर खूपच सुट्ट्या लागल्या आणि मग घरात बसून खूप कंटाळा यायला लागला.कोरोनामुळे कुठे जाणं येणं बंद झालं.त्यामुळे आम्ही विद्यार्थी आँनलाईन शिक्षण घेण्याच्या जाळ्यात अडकलो.खर तर पाच-सहा दिवस उत्सुकता वाटली.नंतर मग ऑनलाईन शिक्षण मध्ये खूप अडचणी येऊ लागल्या.मनात प्रश्न निर्माण झाले.ऑनलाईन शिक्षण तर कधी-कधी नेटवर्क मुळे शिक्षण घेणं कठीण जात होतं.
           शिक्षकांनी पेपर होतील, याची जाणीव सगळ्यांना करून दिली. चार दिवसांनी पेपर या तारखेपासून होतील ,याची घोषणा केली.मनात तर खूप भिन्न भिंती होती.जेव्हा मी माझ्या आईसोबत शाळेत पेपर देईला गेले तेव्हा आमच्या शिक्षिका म्हणाल्या की शाळा ही लवकर चालू होतील.शेवटी महिन्यांनंतर २३ नोव्हेंबर ला आमची शाळा सुरू झाली,तेव्हा तर खूपच आनंद झालेला.सगळे मित्र-मैत्रिणी भेटणार होतो.आणि तो तर आनंद खूपच वेगळा होता.एकमेकीना व्हिडिओ चॅट वर नाही तर त्यादिवशी प्रत्येकशात समोरासमोर भेटणार होतो.पण खरंच सगळ्यांना या २०२०सालामधील अनुभव लक्षात राहतील.
            २०२० बाकी कसेही गेले असले तरी त्यामुळे मला एक-दोन गोष्टी नक्कीच लक्षात आल्या त्या म्हणजे आपल्या कुटुंबाचे आपल्या आयुष्यातले खरे महत्त्व आणि आपण दररोज ज्या गोष्टी करत होतो, त्या आपल्यासाठी किती गरजेच्या आहेत! म्हणजे नियमित शाळेत जाऊन शिक्षण घेणं, व्यायाम करणं, आपल्या जवळच्या लोकांना भेटणं या सगळ्यामुळे आपला व्यक्तिमत्त्व ,विकास होत असतो ,घरी असल्यामुळे या साऱ्या गोष्टी बंद तर पडल्याच परंतु भीती आळस आणि थोडीफार नकारात्मक या गोष्टींना सामोरे जावे लागले.आता आलेले २०२१ मला नक्कीच २०२० सारखे जाऊ द्यायचे नाहीये.स्वत:ची काळजी म्हणून मास्क आणि इतर गोष्टी वापरने गरजेचे आहेच पण इतके दिवस ज्या गोष्टी गृहीत धरून मी जगत होते ते बदलणे गरजेचे आहे! माझ्यासाठी काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याप्रती मी ऋणी असले पाहिजे.गोंष्टीचे नियोजन करून जर मी २०२१ ची सुरुवात केली तर नक्कीच २०२१ छानच जाणार.
                🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
नाव: रिया बजरंग मुळीक
इयत्ता:९वी
शाळेचे नाव: प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा वेश्ची गोंधळपाडा
गट:९वी ते १०वी

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 16, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

माझे अनुभवWhere stories live. Discover now