Nibandh spardha

17 1 0
                                    

नाव : तेजस्वी शिवाजी पाखरे.
इयत्ता : अकरावी
शाळा :  श्री तीलोक जैन विद्यालय , पाथर्डी. तालुका : पाथर्डी . जिल्हा: अहमदनगर.
विषय : निबंध स्पर्धा.
निबंधाचा विषय: माझ्या स्वप्नातील 2030 साला मधील भारत

“ देश ! देश म्हटलं की त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य असतच! भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो तसा की चुका, सुधारणा , चांगल्या-वाईट आठवणी आणि असं बरंच काही जे वर्तमान अशी सांगड घालून त्याची एक उज्ज्वल भविष्य बनवता या व . या भविष्यासाठी खरंतर एक अथवा अनेक स्वप्न असतील आणि ती स्वप्न प्रत्येक देशवाशी आपल्या देशासाठी नक्कीच पाहत असेल .

“ निरखून पाहताना उद्याचं भविष्य त्यात इतिहासापेक्षा अजरामर असावे आणि त्यांनी इतिहासाच्या पानातून जाणलेल्या राज्य किंवा मग शिवरायांच्या स्वराज्यासारखा अभिप्रेत व्हावं, अशी इच्छा व्हायला लागते !

आपल्या धर्म स्वाभिमान पोटी दाखवली जात असणारी अक्षम्य विषमता , काही लोकांचा स्व - विचारांनी आणि स्वतःच्या वैचारिक बुद्धीने कलह मांडलेला असामाजिक विचार दूषित झालेला समाज, हे सर्व पाहून यामुळेच “ मला माझ्या स्वप्नातल्या भारत मी उघड्या डोळ्यांनी साकारावा,” अशी इच्छा निर्माण होते. जे माझ्याकडे आहे त्याची स्वप्न मी नाही पाहू शकत किंवा मी जे पाहिले ते पाहण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि का करावा ? पण मी जे पाहिले ते पाहण्यासाठी मला प्रबळ इच्छा आहे. ती स्वप्न मी माझ्या देशासाठी नक्कीच पाहिल.

“ स्वप्न होतात साजरे ती होतात गुजरे
वैभव येण्या स्वप्नपरी स्वप्न यावी पहाटे”.

अशी साजिरी गोजिरी स्वप्न प्रयत्नांती पहाटे देत असतात आणि ती पहाट होण्यासाठी सुखाची फळे चाखावी लागतात याची कल्पना सर्व ठाई असेलच. माझ्या स्वप्नातील भारतात शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा सुधारताना आणि त्या संपूर्णत  शिक्षणाने भारताचे एक तरुण बेरोजगारीला धूळ चारत जगाच्या नकाशावर प्रगतीचे गाणे गाताना मी स्वप्न पाहते. माझ्या स्वप्नातील भारत खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी म्हणाला जात असताना तो पूर्णत्वाने देशातील अंतर्गत कलह मिटवून ताठ मानेने जगासमोर उभा राहताना मी स्वप्नरुपी पाहते .

भारतात खूप समस्या घर करून बसल्या आहेत त्या समस्या मध्ये आणखी खूप मोठे समस्येची भर झालेली आहे ती म्हणजे 2020 मध्ये आलेला हा विषाणू ही महामारी देशाचे आर्थिक शैक्षणिक तसेच सामाजिक परिस्थिती गंभीर करून टाकलेले आहे. भारत देश उभा राहील आणि पहिल्यापेक्षाही अधिक उत्साहाने देशाची प्रगतीसाठी भारतातील प्रत्येक नागरिक उभा रहावा, असे मला वाटते.   “ उगवत्या सूर्याप्रमाणे त्या भारत मातेने मोठ्या दिमाखात उभं राहिलं मला पाहायचा आहे! ”
“ स्वप्न मनीषा पूर्णत्वास जाऊन मिळावी
भारत देश स्वानुभव ती हू न यावी”
तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला भारत सु - संस्कृतीने संस्कारक्षम असलेला भारत, सुशिक्षित तरुणांच्या बळाने जगात स्वतःचं स्थान निर्माण करणारा भारत, धर्मनिरपेक्ष जातीपातीच्या विचारांना आहुती देऊन प्रगतीकडे वाटचाल करणारा भारत पर्यावरण पूरक निसर्गाने नटलेला माझा भारत मला पाहायचा आहे.

“ नको नको ती द्वारा तिचे कर्कश अंधारे
मला हवीत झगमगणारी सूर्यप्रकाश अन तारे”

मानवी उत्क्रांती पासून ते देश स्वातंत्र्य होऊन विकासाच्या वाटेने धावणारा माणूस या देशाने पाहिलेला आहे . “ युगपुरुष गौतम बुद्धांसारखं, महामानव शिवरायांसारखा छत्रपती, तुकोबा आणि ज्ञानोबा माऊली सारखे संतमंडळी, असे क्रांतिकारी या देशाने पाहिले आहेत. त्या त्या  परवाला ते ते लोक मिळाली आणि या देशाची उन्नती होत गेली मलाही या  क्रांतिकारक सारखं सोनेरी परवाची साक्षीदार व्हायला नक्की आवडेल .

माझ्या स्वप्नातील भारत उभा राहण्यासाठी एक क्रांतीपर्व पेटले पाहिजे , एक साहित्यिक चळवळ उभी राहिली पाहिजे , एक देश प्रेमाची, एक समुदायाने असली पाहिजे , त्यासाठी युगपुरुष घडले पाहिजे, शैक्षणिक प्रगती खेळ, पर्यावरण समतोल या सर्व गोष्टींचा मेळ एक होऊन माझ्या स्वप्नातला भारत या जगाचा प्रतिनिधित्व करताना मला पाहायचा आहे .

“ माझा देश महान होता माझा देश महान आहे आणि माझा देश महान राहणारच!”

कोणत्याही परिस्थितीत कधी जमणार नाही आणि माझ्या स्वप्नातील भारत खूप प्रगती करेल आणि आणि सर्व जगात प्रसिद्ध होईल.
“ मला मी भारतीय आहे याचा खूप अभिमान आहे!”

“ जडो घडो असे पर्व डोळ्यापुढे स्वप्नवत
भारत देशा हे जल - भूतल घालो दंडवत!” घालो दंडवत!”

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 18, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

Nibandh spardhaWhere stories live. Discover now