नवी सुरुवात........"Hi.... तू नूतन विद्यालयात होतास ना?"
मला जेटलॅगमुळे झोप येत नव्हती. रात्रीचे दोन वाजत होते, काय करावे, म्हणून मी सहज फेसबुकवर गेले तेव्हा मला तो ऑनलाईन दिसला आणि जणू पुस्तकाची पाने पलटावी तश्या सर्व जुन्या आठवणी एकामागोमाग डोळ्यासमोर येऊन गेल्या. मला वाटले माझे आता फेसबुक लॉगिन करणे अगदी सफल झाले होते.
बचपन का प्यार.... कन्सेप्ट कसली भारी वाटते ना. माझा ही एक क्रश होता. ओजस अहिरे. माझा सिनियर होता. हुशार असल्यामुळे आणि अगदी सर्व स्पोर्ट्स मध्ये देखील अग्रेसर असल्यामुळे, ओजस शिक्षकांसकट सर्वांचाच फार लाडका होता. दिसायला तर असला क्युट होता की त्याला पाहतच राहावे. त्याच्या वयाच्या इतरमुलांप्रमाणे हाडकुडा अजिबात नाही, आणि जाड ही नाही आणि उंची ही मस्त.
मी सातवीत होते तेव्हा तो नऊवीत होता. हे तेच वर्ष होते जेव्हा सर्वांचा ओजस दादा माझ्यासाठी फक्त ओजस झाला. फ्री पिरिएड असला की सिनिअरसला लहान मुलांच्या वर्गात एखादे लेक्चर घेण्यासाठी किंवा डाउट्स सॉल्व करण्यासाठी पाठवण्याची पद्दत आमच्या प्रिन्सिपॉल मॅडमनीच सुरु केली होती. तसाच तो प्रथमच आला होता. वर्गात येताच त्याने सर्वांचे अगदी छान मनोरंजन केले होते , शक्य तितका कमी आवाज ठेवत, आम्ही जाम धमाल केली होती. पण थोड्यावेळाने बाजूच्या वर्गातले टीचर आले आणि त्यांनी ओजसला आम्हाला गणिते शिकविण्यास सांगितले.
मला वाटले हा मस्त चान्स आहे, आपल्याला अलजेब्रिक एक्सप्रेशन तसेही नीट समजले नाही तेव्हा आपण याला तेच शिकवायला सांगावे, म्हणून मग मीच उठून उभे राहत त्याचे लक्ष माझ्याकडे वेधून घेतले आणि त्याला अलजेब्रिक एक्सप्रेशन शिकवण्यास सांगितले. हे सांगतांना जेव्हा माझी त्याच्याशी प्रथमच नजरानजर झाली, तेव्हा माझा घसाच सुकला. कसेबसे चाचरत मी त्याला माझे मत सांगितले आणि मग खाली बसत माझ्या बॉटल मधून घटाघट पाणी पिउन घशाची कोरड दूर केली. त्यावेळी त्याने हे सर्व नीट नोटीस केले होते बहुतेक ,कारण नंतर तो माझ्या जवळ आला आणि माझ्या बाजूच्या रिकाम्या जागी बसत त्याने मला विचारले,
YOU ARE READING
नवी सुरुवात
Short Storyएक छोटीशी लव्ह स्टोरी.... एका हरवलेल्या प्रेमाची आणि त्यातून झालेल्या नव्या सुरुवातीची...