भेटीसाठी नयनाने शहराच्या वर्दळीपासून लांब असलेला कॉफी शॉप निवडला. प्रसादच्या आधीच तिथे येऊन ती त्याची वाट पाहू लागली. पाच - एक मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर तिला प्रसाद बाहेर त्याची बाईक पार्क करताना दिसला.
प्रसाद सावळा असला तरी त्याची एकूण राहणीमान, उंची कपडे यामुळे तो चांगलाच रुबाबदार दिसत असे. नाही म्हटलं तरी दोघांच्या संबंधात हि काय ती जमेची बाब ठरलेली.नयनाच्या समोर बसत प्रसादने त्याचा गॉगल काढला. एक किंचित स्माईल त्याच्या चेहऱ्यावर विसावली. प्रत्युत्तर म्हणून नयनानेही हास्य केले. काही क्षण असेच शांततेत गेले. नयनानेच कॉफीची ऑर्डर दिली.
अखेर प्रसादचे तोंड उघडले.
प्रसाद - " पंकज घरी नाही म्हणून बोलावले आहे की स्पेशल काही ??"
प्रसादने ' स्पेशल ' या शब्दावर दिलेला जोर नयनाने ताडला. चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत ती म्हणाली, " थोडं बोलायचं होतं. आपल्या नात्यांसंबंधी.....!"
आजच्या भेटीचे कारण नयनाच्या तोंडून ऐकल्याने प्रसादला पुढे होणाऱ्या चर्चेची कल्पना आली. नयना आता आपल्या पौरुषावर भलतीच भाळली आहे. आता हि आपली रांड बनून राहणार. म्हणजे आपली चंगळ !
" काय विचार करत आहात ? " प्रसादची तंद्री भंग करत नयनाने विचारले.
आपल्या ठेवणीतील स्माईल पुन्हा देत प्रसाद म्हणाला, " आपल्या ह्या नात्यावर तुम्हीच बोलणं अपेक्षित आहे. कारण तुमच्या इच्छा आकांक्षांमुळेच आज आपल्यात काहीतरी विशेष नातं आहे."
प्रसादने अशी गुगली टाकताच नयना काही क्षण शांत राहिली. सगळा श्वास एकवटून ती बोलू लागली,
" प्रसाद, आपल्यात जे संबंध असतील ते करारात्मक असतील."
आपली भूवयी उंचावत प्रसाद म्हणाला, " म्हणजे ?"
नयना - " मी एकदा गरोदर झाले की आपण आपले शरीर संबंध बंद करायचे. "
हे ऐकुन प्रसादचे तीन तेरा वाजले. नयना अशी काही बोलेल ह्याची त्याला कल्पना नव्हती.
प्रसादने वैतागून विचारले, " पण का...?"
नयना - " मी पंकजवर मनापासून प्रेम करते. मी शरीर जरी तुमच्यासोबत शेअर केलं असेल तरी मन मात्र सर्वस्वी त्याचेच आहे. "
प्रसाद - " तुम्ही मन त्याच्याजवळच ठेवा पण शरीर... शरीर तर मला देत चला ना...!"
हे म्हणत असताना प्रसादची हपापलेली नजर नयनाच्या अंगावरून फिरली.
नयना - " पण एकदा आपत्यप्राप्ती झाल्यावर ठेवलेले संबंध म्हणजे प्रतारणा ठरेल."
प्रसादला कळून चुकले की यावेळी नयनाला फोर्स करून काही हाती लागणार नाही. उलट ती आत्ताच संबंध ठेवायला नको म्हणेल. त्यापेक्षा आता हा त हा मिसळू. नंतरचे नंतर...
प्रसाद - " ठीक आहे. मी तुमच्या इच्छेच्या बाहेर नाही. जितके दिवस तुमच्याशी संबंध ठेवता येतील त्यातच समाधान मानून रहावं लागेल."
प्रसादचा स्वर दुःखी होता.
अंधार पडू लागलेला. नयना जायची गडबड करू लागली. रात्री परत भेटण्याचे ठरवत दोघांनी घरचा रस्ता धरला.