माझा आदर्श व्यक्ती कोण ?

7 0 0
                                    

            काल स्वातंत्र्य दिन होता. मी शाळेचा माजी विद्यार्थी असल्याने आणि गावातील निवृत्त वरीष्ठ  शासकीय अधिकारी होतो. शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व त्यांच्या  भविष्यातील करियरच्या वाटचालीसाठी  योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मला स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या व्यवस्थापकांनी आमंत्रित केले होतं. मी  पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमला गेलो होतो... स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. कार्यक्रमास अजूनही बरीच मंडळी उपस्थित होती.शाळेच्या मुलांचा प्रेक्षक वर्गही मोठा होता.  मी सुध्दा स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द बोललो स्वातंत्र्य बद्दलचा आपला लढा आणि आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्य ची महतीही मी मुलांना सांगितली अखेर माझं भाषणही झालं. नंतर शाळेच्या प्रिन्सिपलचं भाषण झालं आणि शेवटी बक्षीस वितरण सोहळा सुरू झाला... मागच्या वर्षी शाळेत दहावीत पहिल्या आलेल्या मुलांची नाव पुकारले गेली... त्यांना त्यांच्या गुणाप्रमाणे बक्षीस वाटली गेली आणि त्यांना त्यांच्या या यशामागचं गमक  , त्यांनी हे मिळवण्यासाठी केलेली मेहनत यांच्या उलगडा सर्वांसमोर मांडावा म्हणून चार शब्द सांगण्याची विनंती सुत्रसंचलकाने केली...  प्रत्येक विद्यार्थी आपलं  एक वेगळं मत मांडत होतं ,त्यांनी मिळवलेल्या यशाचं श्रेय कोणी शिक्षकांना नंतर कोणी आपल्या  पालकांना देत होत... आपल्याला भविष्यात काय व्हायचंय याची पूर्वकल्पना सर्वांसमोर मांडत होत ...शेवटी प्रत्येकाने आपापला आदर्श व्यक्ती ( Role model )  कोण आहे  हे पण सांगितलं ,  मी मन लावून त्यांची ती मत ऐकत होतो... प्रत्येकाचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्हिव होता...होता होता सगळ्यांची मत झाली अखेर कार्यक्रमाची सांगता झाली...मी शाळेत झालेल्या नवनवीन सुखसोई बघितल्या...शाळेचं हे नवरूप डोळ्यात साठवून घेतलं...स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमला मला बोलवल्याबद्दल मी मुख्याध्यापकांचे आभार मानले आणि घरी निघालो...पण या पूर्ण  प्रवासात फक्त त्या मुलांचं ते मत आठवत होतो आणि त्याबद्दल विचार करत होतो त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आदर्श व्यक्ती बद्द्लच्या संकल्पना आठवत होतो , काही वेळात घरी पोहोचलो.... थोड्या वेळात फ्रेश झालो आणि माझ्या रूम मध्ये येऊन बसलो आणि पुन्हा तेच विचार... त्यांचे आदर्श व्यक्ती का बरं तेच व्यक्ती असू शकतात ?

लेखसंग्रह Opowieści tętniące życiem. Odkryj je teraz