१५ दिवस सुट्टी असल्यामुळे मी कोकणात गावाला गणपतीसाठी जायचा विचार करत होती. सुट्टीसाठी फक्त एकच दिवस बाकी होता आणि त्याच दिवशी दुपारी लंच टाईमला मला पिसाट काकूंचा फोन आला. फोन बघून मला भलताच घाम फुटला होता व खूपच भीती वाटत होती..! म्हणून मी फोन उचलाच नाही. काकूंचा पुन्हा फोन आला, आता मात्र मला चिंता वाटू लागली होती..! 'काही बर वाईट नसेल ना झालं?' असं विचार करून मी लगेचच फोन उचलला. पलीकडून एक नवीन आवाज माझ्या कानी पडला, "हॅलो, समीर का?"
मी चाचपडत, "हो, बोलतोय बोला"
"अरे समीर, मी अमृता बोलतेय..! पिसाट काकूंची सून" तसा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.
मी, "अरे वहिनी बोला ना..! काय काम होत?"
वहिनी, "अरे थोड महत्वाचं काम होत पण ते फोनवर नाही सांगता येणार. तू एक काम कर रात्री घरी जेवायला ये, त्यानिमित्ताने आपलं भेटण सुद्धा होईल".
मी, "वहिनी जेवण कशाला? मी जेवलो असतो बाहेर, उगाच तुम्हाला त्रास!"
वहिनी, "अरे त्यात त्रास कसला, तो आमचा शेजारधर्मच आहे!"
मी, "ठीक आहे".
वहिनी, "नक्की ये, न विसरता..! आम्ही वाट बघू तुझी"
असं बोलून वाहिनीने फोन ठेवला.माझ्या डोक्यात चित्र विचित्र विचार चालू झाले. 'काकूंनी वहिनीला सांगितलं तर नसेन ना? मला अचानक असा जेवयला का बोलवल? रूम वरून काढून तर नाही टाकणार ना?' माझं डोकं जड झाल विचार करून करून..! विचार करता करता कधी ड्युटी संपली मलाच नाही कळलं. मी रूमवर आलो आणि फ्रेश झालो. मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. इतक्यात पिसाट काकूंचा फोन आला. मी घाबरत घाबरत फोन उचलला. समोरून अमृता वहिनी बोलत होती, "आलास का समीर रूमवर? लवकर फ्रेश होऊन ये".
मी, "हा वहिनी, आलोच".मी स्वतःला सावरून काकूंच्या घराची बेल वाजवली, अमृता वहिनीने दरवाजा उघडला. मी पहिल्यांदाच अमृता वहिनीला प्रत्येक्षात बघत होतो. फोटोपेक्षा ती कैक पटीने सुदंर दिसत होती.!
मी घाबरत घाबरत घरात प्रवेश केला आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. काकू स्वयंपाक घरात जेवणाची तयारी करत होत्या, वहिनी त्यांना मदत करत होती. मी सोनू सोबत टाईमपास करत बसलो. वहिनीने जेवण वाढायला सुरुवात केली. सर्व वाढून झाल्यावर काकू पण टेबलावर येऊन बसल्या. माझी बिलकुल हिम्मत होत नव्हती त्यांच्याशी नजर मिळवायची..! मी मान खाली घालून जेवायला सुरुवात केली. जेवण चविष्ट झाले होते.