मला तसे नेहमी स्वप्न पडतात. पण आजच्या स्वप्नाची गोष्ट काहीतरी वेगळीच होती. ज्याचा लांब लांबपर्यंत माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी संबंध नव्हता.
नेमके काय स्वप्न होते हे......आणि मी दचकून उठले.
रात्रीचे 2:00 झाले होत आणि जहाजाची निघण्याची वेळ सकाळी 6:30 होती म्हणून मी परत झोपून घेतल.
Ohh.......No........वाचवा मला
मला माझा हात सुटतोय....
ते खाली काय आहे??.....
आ...आ.....(स्वप्नात)डोळे उघडले.
मोबाईल मध्ये टाइम पाहिला.
अरेरे...
Damn it ..मला खुपच उशीर झाला होता.मी कसेबसे आवरले.बरं झालं मी रात्रीच पॅकिंग केली होती असा विचार मनात चाललाच होता तर तेवढ्यात टॅक्सी आली.मी टॅक्सी पकडली व सुटकेचा श्वास घेतला.त्यानंतर माझ्या मनात विचारांचे चक्र पुन्हा सुरू झाले... शेवटी तो दिवस उजाडलाच ज्याची मी किती दिवस वाट पाहत होते. आता कुठलीही कसर सोडायची नाही प्रत्येक क्षणाचा मनसोक्तपणे आनंद लुटायचा.....विचारांना पूर्णविराम देत मी उतरले समोर पाहते तर सर्वजण उपस्थित होते परंतु मी नेहमीप्रमाणेच
Latecomer...जहाजाचा भोंगा वाजला...
जहाजाची निघण्याची वेळ झाली.आम्ही जहाजात चढलो.
ते जहाज......
काय सांगू मी त्या जहाजाविषयी मी एवढे मनाला भावून टाकणारे प्रशस्त जहाज पहिल्याच वेळेस पहात होते.एका बर्फाच्छादित प्रदेशाप्रेमाने ते पांढरीशुभ्र होते त्या रंगाप्रमाणेच ते शांत व स्थिर होते जणु पाण्यात बगळ्याप्रमाणे माशांवर टपून बसलेले आहे.