मी डोळ्यांवर पाणी मारले.बाहेर सर्वांची कोणत्यातरी खास गोष्टीवर चर्चा रंगली होती.आज संध्याकाळी जहाजाचे कॅप्टन
Mr Wang XiYi यांनी सर्वांना "Friendship day" स्पेशल पार्टी चे नियोजन केले होते.काहीजण पार्टीची तयारी करत होते;तर काहींना मोबाईलपासून विश्रांतीच नव्हती पण अधून-मधून सर्वांच्या नजरा घड्याळाच्या काट्याकडे वळण घ्यायच्या.असा नित्यक्रम चालू असताना मी बॅग उघडली व तिच्यातून कार्ड काढले.
"The Mystry Cards"मी हाताने पॉईंट आऊट करत सर्वांना विचारले,"Is anybody interested to play cards?"
हात वरती करून Momoro आणि Miya हातातली कामे सोडून कार्ड खेळायला आले.
खेळाला सुरुवात झाली.Momoro कार्डस ला निहाळून पाहत होता."Hey........हे तर 'Adventure Movie' चे कार्डस आहेत ना!!...",Momoro.
मी,"Yeah offcourse"
खेळ रंगत चालला होता आणि Satsuki म्हणाली,"I want to take some rest before the party."
Echi replied ,"go ahead". तेवढ्यात तिची नजर आमच्या कार्डस कडे पडली."अरे!!......या कार्ड्स मध्ये काही कार्डस वेगळे आहेत का Chihiro...?" ती माझ्याकडे वळत म्हणाली.
मी कार्डस चा बॉक्स उचलत उत्तर दिले..."मी तर आत्ताच घेतलेत ट्रीपची शॉपिंग करताना!"
"Ohh......it's okay dear मला तसे वाटले असावे.
Can I join you??..",Echi.खेळात पूर्णपणे बेधुंद आम्ही सर्वजण घड्याळाकडे पाहणे विसरूनच गेलो.शांततापूर्वक व अचूक काम पार पाडणारे घड्याळाचे काटे जणु आतुरतेने आमच्याकडे पहात होते. आमच्या डोळ्यांची एक झलक त्यांना हवीहवीशी वाटत होती. परंतु आम्ही सर्वजण आमच्या खेळात हरवलो होतो.