धुळवड

2.3K 7 0
                                    

एक थेंब रंगाचा 
गालावरुन ओघळनारा 
भिजवून कांतीला
खुलवून दाखवनारा 

एक थेंब  रंगाचा
पाठीवर ओघळनारा
लयदार नक्षीला तो
अलगद चेतवनारा

एक थेंब रंगाचा
माझ्या मनात थिजलेला
देहातून माझ्या
तूझ्या देहात रुजलेला

एक थेंब रंगाचा
कानावर पडणारा
झूमक्यांच्या कंपणात
ओठांवर नाचणारा

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Mar 18, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

Happy HoliWhere stories live. Discover now