तुमच्यासाठी कायपण..!

3.4K 14 3
                                    

तुमच्यासाठी कायपण ..!

लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार होत्या .  त्यामुळे रात्रंदिवस आमचं सगळीकडे फिल्डिंग लावायचं ,  जागोजागी जाऊन प्रचार करायचं काम सुरू होतं . सगळ्या ठिकाणी मी भाषण करायला जायचो . अशातच त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मी प्रमुख फक्त म्हणून गेलेलो असताना तुम्ही गर्दीच्या बंदोबस्तासाठी त्या ठिकाणी आलेला होता .

माझं लक्ष तुमच्याकडे गेलं नसतं , पण त्या तरवडेमुळे तुम्ही माझ्या नजरेत आला . हा तरवडे नुसता पीआय  आहे पण मला आवाज चढवून बोलतो , घाबरत नाही साला . पण तुम्ही आल्यावर त्याची धांदल उडालेली माझ्या नजरेतून सुटली नाही .

किरकोळ कॉन्स्टेबल सारखं तो तुमच्या गाडीचं दार उघडत होता .  तुम्ही बाहेर आल्यावर त्याने ठोकलेला तो कडक सलाम बघून तुमच्याबद्दल त्याच क्षणी माझ्या मनात आदर निर्माण झाला . तरवडे सारखा माणूस तुम्हाला टरकतो म्हणल्यावर तुम्ही काहीतरी खास असणारच  .

आणि तेव्हा मी तुमच्याकडे लक्ष देऊन पाहिलं . पहिल्या वेळी तुम्हाला बघितल्यानंतर तुमची जी प्रतिमा माझ्या मनात ठसली , उमटली , रेखाटली गेली ती अजूनही तशीच आहे . तुमचं ते रूप माझ्या मनाच्या मंदिरात देवाच्या मूर्ती प्रमाणे मी दररोज पुजतो आणि क्षणाक्षणाला त्याला आठवतो हे तुम्हाला माहिती नसेल .

काय दिसत होता तुम्ही . खरंच आतापर्यंत कोणत्याही स्त्रीला पाहून मी एवढा मंत्रमुग्ध झालो नव्हतो . ती फक्त वासना नव्हती , मी फक्त तुमच्या शरीराकडे आकर्षित झालेलो नव्हतो . प्रत्येक मानवाचं एक व्यक्तिमत्व असतं , दरारा असतो , त्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर होणारा परिणाम असतो , एक वेगळाच औरा असतो . एक राजकीय नेता म्हणून मला ते माहिती आहे आणि तुमच्यात तो मला जाणवला .

तुम्ही यायच्या अगोदर असंच इकडे तिकडे बसलेले सर्व पोलीस कर्मचारी तुम्ही आल्यानंतर झटकन उठून ताठ उभारून सगळीकडे लक्ष देऊ लागले . नुसत्या तुमच्या येण्याने मागच्या बाजूला गोंधळ करणारे लोक पूर्णपणे शांत झाले . नुसत्या तुमच्या येण्याने हवेचे वजन वाढले आणि एक वेगळीच उबदार गर्मी त्या ठिकाणी पसरली .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 20, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

तुमच्यासाठी कायपण....! Where stories live. Discover now