अबोलीने ऑफिस सुरु केले रोज ती बस ने जायची. तशी काळजी नव्हती कारण स्टॉप घराजवळच होतं ती उतरायची आणि बस मध्ये बसायची तिचा ऑफिस नीलडोह ला होतं. ऑफिस छोटंसं होतं खूप लोक नव्हते त्यामुळे ऑफिसमध्ये मजा मस्ती चालायचं सर्व एकमेकांशी मिळून मिसळून राहायचे. हळूहळू अबोली सर्वाना ओळखीची होत गेली आता नागपूर आणि तिचं छोटंसं गाव खूप पडायचा त्यातल्या त्यात ती साडी घालणारी आणि ऑफिस मध्ये बऱ्याच मुली जीन्स टॉप मध्ये टॉप टीप असाच्यात. ऑफिस च्या एका बाजूला तिच्या काही टेस्टिंग लॅब्स होत्या आणि एकाबाजूला स्टाफ बसायचा.
समोर सेक्युरिटी गार्ड असायचा आत मध्ये येताना अंगठ्याचा शिक्का मारून हजेरी लागायची आणि मग उजव्या बाजूला वळून तिसरा टेबल अबोलीचा होता तिच्या थोड्या समोर २ मुली बसायच्यात आणि बाजूला आठवले काकू. थोड्या जाड्याजुड्या पण राहण्यात एकदम मॉडर्न . डाव्या बाजूला २ मुलं बसायचीत पण ती सहसा फील्ड वर्क ला असायची. एका बाजूला कॉर्नर मध्ये त्यांचे बॉस चे केबिन होते आणि त्यांच्या समोर एक इंजिनिअर बसायचा थोडा उंच पुरा.
अबोली कमी बोलायची पण ती खूप मनमिळाऊ होती हळू हळू ह्या सर्व लोकांशी तिचं चॅन जमायला लागलं कधी चहा पाणी कधी सामोसा पार्टी . मस्त सुरु होतं आणि अबोली आता सर्वांमध्ये रुळली होती तसा तिला आता महिना होत आला होता आणि आता पगार पण मिळणार म्हणून ती मनातल्या मनात आपले आकडे मोड करत होती.
तो शुक्रवार दिवस होता आठवड्याचा शेवटचा दिवस कारण शनिवार आणि रविवार सुट्टी असायची मग अबोली कधी कधी गावाला जाऊन यायची कधी ती आपलं घर आवरत बसायची. आज पगार मिळणार म्हणून ती सुखावली होती तिचे हिशेब झाले होते बाबांना एक शर्ट पीस एक धोतर बाजूच्या काकूंना साडी, घरच्यांसाठी ४ पडदे हो घराचा किराया आणि थोडे सामान. बाकी राहिलेले जमा असू द्यायचे.
अबोलीने बँक अकाउंट चेक केले पण पगार आला नव्हता थोडी ती बेचैन होती तेवढ्यात चहाची वेळ झाली आठवले काकूंनी जोशात येऊन म्हटलं चला रे बालगोपाळांनो चहा प्यायला या आणि सर्व पॅन्टरी समोर येऊन बसले तिथे एक सोफा होता आणि मध्ये एक दोन चेयर सर्व बसले अबोली आठवले काकू शेजारी आणि इंजिनियर बाबू सर्वात शेवटी आले म्हणून त्यांना बसायला जागा नाही मिळाली. ते बघून अबोली आठवले काकूंना म्हणाली