अबोली -1

2.1K 2 0
                                    

अबोली बस मधून उतरली  चालायला लागली तिच्या सोबत तिचे वडील होते त्यांच्या खांद्यावर एक गादी, त्यात काही भांडी, एक स्टोव्ह आणि डोक्यावर एक बकेट. अबोली च्या हातात दोन पिशव्या होत्या वायरच्या आणि ती स्वावलंबिनगरच्या राममंदिराजवळून जात होती. 

बाबा हे काय करताय तुम्ही ? कोणी काय म्हणेल ?

काही नाही म्हणत आपल्याला , पांढरा सदरा पांढरा सुतना घातलेल्या मध्यम वयीन किसनरावांनी अबोलीला हसत हसत म्हटलं 


हे बघा हेच घर ना कोपऱ्यावरच्या दुकानावरचं , किसनराव वरती बघत म्हणाले 

हो बाबा, अबोलीचा थकवा थोडा दूर झाला ते घर बघून 


दोघंही घरी गेले आणि त्यांनी दरवाजा उघडला. घर एकदम छान होतं त्यावर बालकनी आणि राममंदिर दिसेल अशी खिडकी. पण धूळ खूप होती लगेच किसनरावांनी झाडू काढला आणि झाडायला लागले. अबोली भांडी लावायला लागली आणि तिने एका बाजूला गुंड ठेवला पितळेचा आणि त्यात पाणी भरला आणि मग स्टोव्ह पेटवून चहा ठेवला. दोघांनीही मस्त चहा घेतला आणि मग ते समोरच्या कमला लागले. भिंतीवर कॅलेंडर किराण्याचे डब्बे. गंज भांडी सर्व लावून होत पर्यंत सायंकाळ झाली. अबोलीने मग बेसन भात केला सोबत कांदा आणि लोणचं होतंच. किसनरावांनी पोरीच्या हातचं जेवण केलं आणि म्हणाले बेटा तुझ्या हाताला तुझ्या आईच्या हाताची चव आहे. आज पुष्पी असती तर लय खुश झाली असती आणि किसनरावांचे डोळे भरून आले. 


अबोलीला लहानपणापासून किसनरावांनीच वाढवलं होतं तिच्या संपूर्ण शिक्षणापर्यंत आतापर्यंत ती बसने येत जात होती पण नौकरी म्हटलं आणि मग  ठेवणं आलंच त्यातल्या त्यात तिचं शिक्षण तालुक्याला झालं आता ती जिल्ह्यात आली होती. अबोली गावातली एकुलती एक शिकलेली पोर. सर्वांच्या लाडाची, लाडूबाई !!!


अबोली वय २३, ५ फूट ५ इंच उंची काळे कुरळे केस लांब सडक कमरेपर्यंत. लांब नाक थोडे गोल डोळे, साधारण जाड्या भुवया कारण कधी तिने त्यांना थ्रेडींग केलं नव्हतं. ओठ गुलाबी सावळी कांती खांदे रुंद कानातल्या रिंग्स, तिच्या कानाच्या पाळीला शोभून दिसत होत्या. नाकात बेसर पांढऱ्या खड्याची. थोड्या लांब मानेवरील हनुवटीला मधात एक खड्डा हलकासा. लांब सावळा चेहरा. भरीव नसले तरी पण व्यवस्थित छोटे गोल उरोज, त्यामुळे थोड्या सपाट वाटणाऱ्या छातीवर ओढलेली ओढणी. खूप नक्षीदार नाही पण सर्वसाधारण कटी. नितंबालाही फारसा आकार नव्हता मात्र पोट सपाट, थोडे लांब बोट, पायात जुनाट पैंजण. पण ती खूप आकर्षक होती. 


बेटा तुझ्याकडे तीनच साड्या आहेत जमेल ना, थोडे पैसे आले कि घेऊन देतो मग मी, किसनराव काळजीत म्हणाले 

अबोलीकडे तीन कॉटन च्या साड्या होत्या, ती म्हणाली हो बाबा काळजी नको पुढच्या महिन्यात बघू .

अबोलीWhere stories live. Discover now