ऑफिस

5K 21 5
                                    

विश्वास आपल्या कामात अगदी तरबेज होता. त्याचा टीम लीडर नेहमीच त्याच्यावर पूर्णपणे विसंबून असे. कोणतीही डेडलाईन असेल, कोणतंही आव्हान असेल तरी विश्वास उत्तम रिझल्ट्स द्यायचा. सातत्याने त्याला कंपनीत स्टार परफॉर्मरचं बक्षीस मिळत आलंय. आणि म्हणूनच विश्वासच्या टीमलीडरच्याही बॉसने तात्पुरतं, थोडे दिवसांसाठी मेघाच्या टीममध्ये काम करण्यासाठी सांगितलं. तिच्याकडे असणाऱ्या प्रोजेक्टमध्ये खूप चुका झाल्या होत्या. डेडलाईन्स पाळल्या गेल्या नव्हत्या. क्लायंट चांगलेच नाराज होते. आणि त्यात तिच्या टीममधले दोघं अचानक नोकरी सोडून निघून गेले होते. अर्थात याला कारण स्वतः मेघाच होती.

मेघा देसाई. मूळची मराठी, पण वडील आर्मीमध्ये असल्याने बरीच वर्षं देशभर कुठे कुठे राहिलेली. नंतर बिट्स गोवा मधून इंजिनियरिंग केलं आणि अमेरिकेला पुढच्या शिक्षणासाठी गेली. तिथेच एका मुलाशी तिने लग्नही केलं. काही वर्षं त्यांचा संसार झाला. पण नंतर पटेनासं झाल्यावर घटस्फोट झाला आणि ती भारतात परत आली. काही वर्षं दिल्ली, बंगळूरू इथे काम करून आता ती सिनियर टीम लीडर म्हणून विश्वासच्या कंपनीत आली होती. ३७ वर्षांची, घटस्फोटीत, गोरीपान आणि दाट कुरळ्या केसांची आणि अत्यंत सेक्सी गोलाई असणारी फिगर असलेली अशी मेघा कंपनीत आली तेव्हा एकदम हलचल झाली होती. तिच्या एकेका नजरेसाठी अगदी नवीन नवीन नोकरीला लागलेली विशीतली कोवळी पोरं ते पन्नाशीला असणारे, टक्कल पडलेले काका लोक असे सगळेच झुरायचे. पण पहिल्या काही आठवड्यातच हे बदललं- ते तिच्या कामाच्या स्टाईलमुळे. आर्मी कुटुंबातली असल्यामुळे असेल कदाचित, पण मेघा कमालीची कडक होती. 'लीडर' पेक्षा ती 'बॉस' जास्त होती. आपल्या टीममधल्या कोणी काम नीट केलं नाही तर ती त्यांना अद्वातद्वा बोलायची. जास्तीचं काम करण्याची शिक्षा द्यायची. अनेकांना तुच्छपणे वागवायची. सुरुवातीला तिच्याबद्दल असणारं चांगलं मत झपाट्याने बदललं. लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागले, तिच्याबद्दलच्या सुरस कहाण्या पसरू लागल्या. हे तिच्या कानावर गेल्यावर तर तिच्यात अजूनच कडवटपणा आला. सिनियर स्टाफपर्यंत गोष्टी गेल्या. तिच्याबद्दल तक्रारीही केल्या गेल्या. पण कितीही नाही म्हणलं तरी, कामाच्या बाबतीत मेघा अफाट होती. एकतर बहुतेकवेळा तिचं काम बिनचूक असायचं. साहजिकच कंपनीला फायदा करून देणाऱ्या मेघाला एकदोनदा तोंडी समज देण्यापलीकडे कधी गोष्टी गेल्या नव्हत्या. स्नियार स्टाफ तिच्याविरोधात काही करत नाही म्हणून तिच्याबद्दलच्या कहाण्या अजूनच पसरल्या.

ऑफिसWhere stories live. Discover now