मानसी- "हाय अरूणा! कशी आहेस?"
अरुणा - "अग काही नाही बसली आहे. बोल काय म्हणतेस बाकी?"
मानसी - "ऐक ना, आज मी पिंपरी मध्ये येणार आहे. आपण भेटूया का ?"
अरुणा - "अग आज घरी थोड काम आहे. आज भेटणं जरा अवघड वाटत आहे. पण तू नक्की किती वाजता येणार आहेस?"
मानसी - "अग मी संध्याकाळी ५ वाजता येणार आहे बघ, काढ ना ग थोडा वेळ माझ्यासाठी किती दिवसा नंतर मी येतेय आणि तू अस करत आहेस."
अरुणा - "बर ठीक आहे ये, भेटू आपण कायमच्या गार्डन मध्ये कारण घरी काम सुरू आहेत. घरी आपल्याला शांतपणे बोलता येणार नाही."
मानसी - "चल भेटू संध्याकाळी, बाय."
मानसी आणि अरुणा या कॉलेज पासूनाच्या मैत्रिणी होत्या. त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री होती. एकमेकींच्या सर्व गुपित गोष्टी त्या एकमेकींना सांगायच्या. मानसी तशी खूप मिश्किल स्वभावाची खूप बिनधास्त वागणारी. पण अरुणा मात्र शांत, सालस पण समोरच्यावर आपला प्रभाव सहज पडणारी होती. दोघी कॉलेज मध्ये असताना खुप फिरायच्या खूप एन्जॉय करत असायच्या. मानसीचा कॉलेज मध्ये एक बॉयफ्रेंड होता. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा मात्र मानसी त्याच्यासोबत फक्त मौजमजा करता यावी म्हणून रेलेशन मध्ये होती. त्या दोघी आपल्या गावापासून दूरवरच्या कॉलेज मध्ये असल्याने भाड्याने खोली घेऊन राहायच्या. त्यावेळी मानसी व तिच्या बॉयफ्रेंड सुरेशला एकांत भेटण्यासाठी अरुणा कायमच त्यांना साथ द्यायची. मानसी व सुरेशचा प्रणय सुरू असताना त्यांच्या येणाऱ्या मादक आवजांमुळे अरुणाला पण ते सुख उपभोगण्याची इच्छा सतत मनात यायची. पण घरचे संस्कार व तिच्या लाजाऱ्या स्वभावामुळे तिने कधी कोणत्याच मुलासोबत जवळीक साधली नाही. असेच त्यांचे कॉलेज पूर्ण झाले व अरुणाचे लगेच लग्न झाले. तिला मनमिळाऊ व समजून घेणारा नवरा भेटला. तिचा संसार सुरू झाला. ती संसारात रमली. इकडे सुरेश व मानसीने कॉलेज संपल्यावर लग्न केलं पण त्यांचं कधीच एकमेकांसोबत पटले नाही. त्यामुळे लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मानसी पुणे मध्ये आली व पुण्यामध्ये जॉब करू लागली. या ५ वर्षात अरुणाला दोन गोंडस मुले झाली. आता या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटणार होत्या त्यामुळे मानसी व अरुणा दोघीही उत्सुक होत्या.
आता संध्याकाळ झाली. अरुणा तिच्या लहान मुलाला घेऊन गार्डन मध्ये आली. तेवढ्यात तिथे मानसी सुध्दा आली. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. मानसीने अरुणाच्या मुलाला उचलून घेतले व दोघी एका कट्यावर बसल्या.
YOU ARE READING
जॉब
Fantasyस्वतःचा घरासाठी केलेलं कोणतेही काम वाईट नसते..... प्रणय कथा लिहिण्याची ही पहिलच वेळ आहे. तरीही काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्या जेणेकरून पुढील कथांमधील या सुधारणा करता येतील व आपणास दर्जेदार कथा वाचण्यास सादर करता येतील.