नमस्कार ही कहाणी आहे एका परगावात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या कुटुंबाची..एकमध्यमवर्गीय कुटुंब..नुकताच लग्न झालेला उत्तम अन त्याच वर्षी त्याला शिक्षकाचीनोकरी देखील लागली होती..परंतु नोकरी खुप दूर असलेल्या गावी होती..उत्तम आपल्यापत्नीला म्हणजेच गीतांजली ला म्हणाला, गीतू तू माझ्या आयुष्यात आलीस अन मला लॉटरी चलागली.आपलं लग्न काय झालं अन मला नोकरी सुद्धा लागली..तशी गीतांजली म्हणाली, अहो ही तर तुमची मेहनत मी आपलीनिमित्तमात्र..उत्तम नवीनच लग्न झाल्याने आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता.
गीतांजली
सारखी त्याला ती समोर असायला हवी होती..उत्तम म्हणाला अग पण आपल्याला आता त्या गावी राहावे लागणार ..शेवटी नोकरी आहे म्हटल्यावर जावंच लागणार ..तशी गीतांजली म्हणाली, " हो ना इकडची खूप आठवण येईल नंतर आणि तुम्ही काय ठरवलंय कोण कोण जाऊया तिकडे..कोण म्हणजे .? तू तर असणारच आहेस माझ्या सोबत..मला जेवण कोण करून देईल नाहीतर.आणि( तिला जवळ घेत,) हे तरी कुठे मिळणार नाहीतर..अहो सोडा ना कुणी पाहिलं तर..बेडरूम नाही आहे ही.."हो ग माहीत आहे मला" तशी गीतांजली दूर होते , उत्तम सांगतो की मला वाटत अपर्णा ला आपण सोबत घेऊन जाऊ ..आई बाबा आणि भाऊ इथे राहतील..(अपर्णा उत्तम ची छोटी बहीण होती जी नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती..) आणि मी बाहेर असताना तुलाही मदत होईल..आणि तिलाही तिथे नवीन कोर्स लावून देऊ म्हणजे तिला पुढे उपयोगी पडेल..गीतांजली म्हणाली बर बाबा तुम्ही सांगाल तसं..बरं हे आई बाबांना कधी सांगणार आहात..तसा उत्तम उत्तरला अग आज रात्री जेवताना विषय काढू अन सांगू..
ВЫ ЧИТАЕТЕ
भाड्याचे घर
Любовные романыनमस्कार ही कहाणी लेखिका--सौ आदिती यांनी लिहिली आहे. मला खूप आवडली म्हणून मी तुमच्या बरोबर ष शेअर करतोय . एका परगावात नोकरीसाठी स्थायिक झालेल्या कुटुंबाची..एक मध्यमवर्गीय कुटुंब..नुकताच लग्न झालेला उत्तम अन त्याच वर्षी त्याला शिक्षकाची...