‼ गब्बरसिंग एक 'सरप्राइज पॅकेज' !!

12 2 2
                                    

      “यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है, "सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा”… आजही हा डायलॉग ऐकला की आठवतो शोले चित्रपटातील खांद्यावर काडतुसाचा पट्टा असलेला दरोडेखोर गब्बरसिंग

Oops! This image does not follow our content guidelines. To continue publishing, please remove it or upload a different image.

      “यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है, "सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा”… आजही हा डायलॉग ऐकला की आठवतो शोले चित्रपटातील खांद्यावर काडतुसाचा पट्टा असलेला दरोडेखोर गब्बरसिंग..! आपल्या बटव्यातील तंबाखू हाताच्या तळव्यावर मळून ती तोंडात टाकल्यानंतर तुच्छतादर्शक थुंकत "जो डर गया, समझो मर गया " अशी डायलॉगबाजी करणाऱ्या गब्बरसिंगचा विखारीपणा अभिनेते अमजद खान यांनी स्वतःच्या अभिनयात एवढा मुरवला होता कि, त्यांनी त्याला स्वतःची जन्मजात ओळख करुन देऊन टाकली होती. त्यामुळे प्रेक्षकांसाठी गब्बर हे एक ‘सरप्राइज पॅकेज’ होतं..! 
     गब्बरसिंग म्हणून प्रसिद्ध झालेले अभिनेते अमजद खान यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी आताच्या पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला.  वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी ‘नाजनीन’ आणि ‘अब दिल्ली दूर नही’ या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले. त्या नंतरच्या सुमारे वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बुद्धिबळपटू, दादा, कुर्बानी, लव्ह स्टोरी, याराना, लाव्हारीस यांसह अनेक  चित्रपटांमध्ये चरित्र आणि विनोदी भूमिका केल्या.  परंतू ‘शोले’ मधील गब्बर सिंग याच भूमिकेने ते सगळ्यांच्या लक्षात राहिले. 
       १५ ऑगस्ट १९७५ रोजी रमेश सिप्पी दिग्दर्शित प्रदर्शित झालेला 'शोले' हा चित्रपट आज ४८ वर्षांनंतरही लोकप्रिय आहे. १०० थिएटरमध्ये सिल्व्हर ज्युबली साजरा करणारा आणि मुंबईतील मिनर्वा थिएटरला तब्बल ५ वर्ष सलग चाललेला शोले हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. श्वास रोखून धरायला लावणारे ॲक्शन सीन आणि ड्रामा असलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन,जया बच्चन आणि संजीवकुमार व अमजद खान या दिगज्जांनी प्रभावी भुमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर असा खलनायक देणारे अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले. जन्मदिनानिमित्ताने त्यांना आदरांजली 💐🙏

🎉 You've finished reading ‼ गब्बरसिंग एक 'सरप्राइज पॅकेज' !! 🎉
‼ गब्बरसिंग एक 'सरप्राइज पॅकेज' !! Where stories live. Discover now