‼ गब्बरसिंग एक 'सरप्राइज पॅकेज' !! "यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है, "सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा"... आजही हा डायलॉग ऐकला की आठवतो शोले चित्रपटातील खांद्यावर काडतुसाचा पट्टा असलेला दरोडेखोर गब्बरसिंग..! आपल्या बटव्यातील तंबाखू हाताच्या तळव्यावर मळून ती तोंडात टाकल्यानंतर तुच्छतादर्शक थुंकत "जो डर गया, समझो मर गया " अशी डायलॉगबाजी करणाऱ्या गब्बरसिंगचा विखारीपणा अभिनेते अमजद खान यांनी स्वतःच्या अभिनयात एवढा मुरवला होता कि, त्यांनी त्याला स्वतःची जन्मजात ओळख करुन देऊन टाकली होती. त्यामुळे प्रेक्षकांसाठी गब्बर हे एक 'सरप्राइज पॅकेज' होतं..! गब्बरसिंग म्हणून प्रसिद्ध झालेले अभिनेते अमजद खान यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी आताच्या पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाला. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी 'नाजनीन' आणि 'अब दिल्ली द