इंटरव्ह्यू गेला पाण्यात!

26 0 0
                                    

माझे नाव केशव. जन्म, बालपण आणि शिक्षण सगळे डोंबिवली ईस्टमध्ये झाले. फडके रोडवर आमचे घर! आज पाऊस जरा जास्तच वाटत होता, पण ऑफिसला जाणे पावसामुळे टाळू शकत नव्हतो. नेहमीप्रमाणे पाच नंबर प्लॅटफॉर्मवरुन मी सीएसटी जाणारी फास्ट लोकल पकडली. जरी फर्स्ट क्लास पास असल्याने मी फर्स्ट क्लासमध्ये चढलो असलो तरीही त्यातही गर्दी खूप होती. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळेने ऑनलाइन क्लास ठेवले होते, त्यामुळे माझी दोन्ही जुळी मुलं घरून क्लास अटेंड करत होती. 2020 च्या भयंकर कोविड आपत्तीने ऑनलाइन हा शिक्का मानवजातीच्या माथी मारला. पण आमच्यासारख्या सॉफ्टवेअरशी काहीही संबंध नसलेल्या माणसांना कसले आले ऑनलाइन बिनलाईन? नेहमीप्रमाणे दादर वेस्टला उतरायचे आणि मग बेस्ट बस पकडून कंपनीत जायचे.


आमची प्रॉडक्शन कंपनी "व्ही-स्टार इन्स्ट्रूमेंट्स" जी विविध कंट्रोल इन्स्ट्रूमेंट्स बनवते, त्यात मी मॅनेजर आहे. लोकलमध्ये बसायला जागा मिळाली नाही, कारण लोकल अंबरनाथवरुन आलेली होती. दिवसेंदिवस मुंबई आणि लोकल ट्रेन, दोघांमधली लोकसंख्या खूप वाढते आहे. उभ्या उभ्या एका हातात आडवा मोबाइल धरून पावसाच्या बातम्या बघू लागलो, आणि दुसरा हात लोकलच्या कडीला धरलेला होता. एक बातमीदार घसा दुखेल इतके ओरडून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला हे सांगत असतांनाच 2005 साली मुंबईत आलेल्या पुराच्या घटना आठवून सांगत होती आणि मलाही नकळत तो दिवस आठवला.


19 वर्षांपूर्वी मी याच जुलै महिन्यात माझ्या इंटरव्ह्यूसाठी पाच नंबर प्लॅटफॉर्मवरून मी आठ वाजता लोकल पकडली आणि निघालो. दहा दिवसांपूर्वी "व्ही-स्टार इन्स्ट्रूमेंट्स" या कंपनीत "इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनियर" या रोलसाठी अर्ज केला होता आणि सोमवारी मला घरच्या लँडलाइन फोनवर कॉल आला आणि ईमेल चेक करायला सांगितले गेले. सायबर कॅफेत जाऊन बघितले. याहूवर ईमेल आला होता की, मंगळवार म्हणजे आज 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे आणि पत्ता व इतर माहिती दिली होती. आधी तीन वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिले होते पण तिथे काम झाले नव्हते. मला नोकरी मिळवणे अत्यावश्यक झाले होते.

इंटरव्ह्यू गेला पाण्यात!Where stories live. Discover now