कॅलेंडर

251 13 5
                                    

'कॅलेंडर' या प्राण्याचा नक्की शोध कसा आणि केव्हा लागला हे गुगल बाबांना विचारल्यावर गुगल बाबा नक्की सांगतील. मात्र ज्यांने कोणी हा शोध लावला त्याने समस्त मानव जातीचं आयुष्य आकड्यांशी बांधून टाकलं. नुसते आकडेच नाहीत तर वार ,सण, तिथी या गोष्टी माणसांवर राज्य करू लागल्या आपल्या मनाप्रमाणे त्याला वागवू लागल्या.
     रविवार झोपा , सोमवार पळा... त्यानं वेळेला धरलं आणि एक सिस्टीम बनवली. त्या सिस्टीम प्रमाणे माणूस जगायला लागला. अरे मला सोमवारी सुध्दा झोपयचय किंवा रविवारी सुद्धा काम करायचं आहे. हे माझं आयुष्य आहे आणि मला असंच जगायचंय. जे तुम्हाला वाटतं ते मला नाही मिळवायचय. मला 'माझं' असं काहीतरी वेगळं जगायचंय. हे कोणीतरी आखलेले आकडे आणि कोणतेतरी वार कोण आहेत मला सांगणारे की मी कसं जगायचं!
असे सगळे विचार कॅलेंडर कडे बघून मनात पिंगा घालत होते. माझ्या विचारांना मीच सावरलं आणि उत्तर दिलं,
"हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण सगळं जग ज्या आकड्यांवर धावणं ते आकडे जगासाठी कितीही महत्त्वाचे असले तरी तुझ्यासाठी ते भिंतीवर उडणारे कागद तर आहेत. तुझी वेळ तुझ्याच हातात आहे. आणि तिला किती कसं आणि केव्हा वापरायचं हे तूच ठरवू शकतेस. तुझ्या आयुष्याची चौकट तूच आखू शकतेस आणि असं जगू लागल्यावर तुझ तुलाच कळणार नाही की कधी तुझ्या आयुष्यातील कॅलेंडरमधील दिवाळी आली. थोडंसं कठिण आहे मात्र करून बघायला काय हरकत आहे???"
   

GRIPE WATERWhere stories live. Discover now